spot_img
spot_img
spot_img

अनोखा अनुभव देणाऱ्या ‘समसारा’ चित्रपटाची उत्कंठा शिगेला

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या “समसारा” या हॉरर चित्रपटाची टीजरमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या ट्रेलरमुळे या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता अजूनच शिगेला पोहोचली आहे. चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखांचा इतिहास काय? त्यांच्या आयुष्यातलं गूढ काय? असे अनेक प्रश्न या ट्रेलरने निर्माण केले असून, “समसारा” हा चित्रपट येत्या २० जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. संचय प्रॉडक्शन्सच्या पुष्कर योगेश गुप्ता यांची निर्मिती असलेल्या “समसारा” या चित्रपटाचं दिग्दर्शन सागर लढे यांनी केले आहे.

जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी एक गूढरम्य गोष्ट समसारा हा चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. गूढरम्य गोष्टीला अनुभवी अभिनेत्यांची साथ लाभली आहे. सायली संजीव, ऋषी सक्सेना, डॉ. गिरीश ओक, पुष्कर श्रोत्री यांच्या नेमक्या व्यक्तिरेखा, त्यांना असलेला गूढ इतिहास अत्यंत रंजक असल्याचं ट्रेलरमधून जाणवतं आहे. त्याशिवाय पार्श्वसंगीत, छायांकन, व्हिज्युअल इफेक्ट्सही उत्तम दर्जाचे असल्याचं ट्रेलर मधून जाणवतं आहे. त्यामुळेच चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत गुंतवणारा, भयाचा आणि रहस्याचा अनुभव देणारा असल्याचंही दिसतं आहे. मराठी चित्रपटांत हॉरर प्रकार फारसा हाताळला गेलेला नसल्यानं “समसारा” एक वेगळा प्रयोग ठरणार आहे यात शंका नाही.

सागर लढे, विश्वेश वैद्य, समीर मानेकर यांच्या कथेवर समीर मानेकर, सागर लढे यांनी चित्रपटाची पटकथा रचली आहे. तर समीर मानेकर, निहार भावे यांनी संवादलेखन केलं आहे. विश्वेश वैद्य यांनी संगीत, अक्षय राणे छायांकनाची जबाबदारी निभावली आहेत. कार्यकारी निर्माता म्हणून महेश भारंबे व अन्वय नायकोडी काम पाहिले आहे.”समसारा” चित्रपटाचा अनोखा अनुभव मोठ्या पडद्यावरच घेणे महत्त्वाचे असून, त्यासाठी आता २० जूनपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!