शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भांडार विभाग यांच्या वतीने शहरातील शाळांच्या करिता बेंच (बाक) खरेदी करिता विशिष्ठ ठेकेदार यांना फायदा होईल या हेतूने दिनांक २०.१२.२०२४ ते ३१.१२.२०२४ या कालावधीत जी निविदा प्रक्रियाराबविण्यात आली आहे या निविदा प्रक्रियेत रिंग करण्याच्या प्रयत्नात बेंच खरेदी निविदा प्रक्रिया अडकली असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच याबाबत भंडार विभागाचे उपायुक्त निलेश भदाणे यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राहुल कोलाटकर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे तसेच विद्यार्थी बेंच पासून वंचित राहू नये याबाबत सदर निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी राहुल कोल्हटकर यांनी केली आहे.
आपल्या निवेदनाच्या माध्यमातून राहुल कोल्हटकर यांनी पुढील प्रमाणे निवेदन केले आहे.
१. दिनांक १८.१०.२०२४, ०८.११.२०२४ आणि ०२.०१.२०२५ रोजी सदर निविदा प्रक्रिया बाबत ( दिनांक २७.०९.२०२४ ते ०९.१०.२०२४ या काळात हीच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती ) मा.आयुक्त साहेब आपणांस निवेदनाच्या माध्यमातून काही मुद्दे सादर केले होते. पण त्यावर कोणतेही कारवाई अजून करण्यात आली नसल्याने अजूनही सदर निविदा पूर्ण झाली नाही आहे. काही तांत्रिक अडचणी मुळे सदर निविदा प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर निविदा प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व ठेकेदार यांची एक पुन्हा प्री बीड मीटिंग घेऊन निविदा अटी शर्ती याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात आणि निविदा पुन्हा एकदा नव्याने प्रसिद्ध करण्यात यावी.
२.सदर निविदा ही विशिष्ठ ठेकेदार याला लाभ मिळावा अशा पद्घतीने तयार करण्यात आली होती. यात जे काही मर्जीतील ठेकेदार पात्र झाले त्यांनी निविदा कागदपत्रं आणि कामाच्या अनुभव प्रमाणपत्र यांच्या मध्ये फेरफार करून खोटी कागदपत्र सादर केली आहेत. त्यामुळे चुकीच्या आणि खोट्या कागदपत्र सादरीकरणमुळे ही निविदा अडचणीत आली आहे. त्यामुळे सदर निविदा दस्त यांची तपासणी करण्यात यावी तसेच सदर निविदा पारदर्शक होण्यासाठी सदर निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवण्यात यावी तसेच विशिष्ठ किंवा ठराविक ठेकेदार यांना लाभ होण्याच्या हेतूने अटी शर्ती त्याच्या पद्धतीने तयार करून टेंडर प्रक्रियेत रिंग करणाऱ्या भांडार विभागाचे उपायुक्त श्री.निलेश भदाने यांची चौकशी करण्यात यावी आणि या निविदा प्रक्रियेचे अधिकार त्यांच्या कडून काढून घेण्यात यावे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने शहरातील महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी यांना बसण्यासाठी बेंच (बाक ) तसेच शाळेतील फर्निचर खरेदी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भांडार विभाग यांच्या वतीने दिनांक २७.०९.२०२४ ते ०९.१०.२०२४ या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. सदर निविदा प्रक्रिया याला प्रतिसाद मिळत नसल्याने पुन्हा दिनांक २०.१२.२०२४ ते ३१.१२.२०२४ या कालावधी करिता पुन्हा नव्याने ही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. दिनांक १८.१०.२०२४ आणि ०८.११.२०२४ रोजी मा. आयुक्त साहेब आपणांस निवेदनाच्या माध्यमातून सदर निविदा प्रक्रिया ही शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या २ ठेकेदार यांना लाभ मिळावा ह्या हेतूने त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडे उपलब्ध असणारे प्रमाणपत्र , कागदपत्र , तसेच शॉप ॲक्ट मध्ये फर्निचर चा उल्लेख असावा तसेच
१. past 7 years experience compulsory
२. OEM Authorized reseller compulsory
३. BIFMA level 3 certificate compulsory
अशा अटी टाकून तयार करण्यात आली आहे हे निवेदनाच्या माध्यमातून सादर केले आहे. यावर आपल्या वतीने संबंधित भांडार विभागाचे उपायुक्त श्री निलेश बदने यांना सूचना करण्यात आली त्यानुसार त्यानी काही ठराविक शुल्लक अटी जसे की , कामाच्या अनुभव १ ते ७ वर्षाचा असवा असा बदल केला आहे . जो की पूर्वी ७ वर्षाचा असावा असा होता. पण ज्या मुख्य अटी शर्ती ठराविक संस्थांच्या प्रमाणपत्राच्या ज्या मागण्या केल्या आहेत त्या तशाच आहेत, जसे की
१. ISO9001:2015, ISO14001:2015, ISO 45001:2018, ISO 50001:2018 नामांकन
असलेबाबतचे वैद्य मुदतीतील प्रमाणपत्र NABCB प्रमाणित आवश्यक आहे.
२. BIFMA LEVEL 3 CERTIFICATE , GREENGAURD CUMPLAINCE CERTIFICATE,
CII CERTIFIED GREEN CO CERTIFICATE अशा ठराविक संस्था यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र यांची मागणी केली असल्याने वरील अटी शर्ती मुळे सदर निविदा प्रक्रिया पारदर्शकपणें राबविण्यात येत नसल्याची तक्रार अनेक ठेकेदार तसेच यात सहभागी होऊ इच्छित असणारे उद्योजक यांनी पुन्हा व्यक्त केली आहे. मागील निविदा प्रक्रियेत फक्त एकच ठेकेदार पात्र असल्याने सदर निविदा प्रक्रिया पुन्हा राबवावी लागली त्यामुळे सदर निविदा प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व ठेकेदार यांची एक पुन्हा प्री बीड मीटिंग घेऊन निविदा अटी शर्ती याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा. तसेच शहरातील उद्योजक यांना भाग घेता येईल अशा अटी शर्ती टाकण्यात याव्यात जसे की , NABCB याचं संस्थेने प्रमाणित केलेले ISO प्रमाणपत्र, BIFMA LEVEL 3 CERTIFICATE , GREENGAURD CUMPLAINCE CERTIFICATE, CII CERTIFIED GREEN CO CERTIFICATE
अशा ठराविक संस्था यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र याची मागणी न करता त्याला समांतर अथवा त्याचं दर्जाच्या ज्या संस्था असतील त्याचे सुद्धा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. अशा विशिष्ट ठेकेदार यांना लाभ होईल अशा ज्या अटी शर्ती आणि प्रमाणपत्र यांच्या मागण्या केल्या आहेत त्या शिथिल कराव्या आणि निविदेत स्पर्धा निर्माण करावी जेणे करून अनेक ठेकेदार सहभागी होऊन वस्तूचा दर्जा तसेच दरात स्पर्धा तयार होऊन ठराविक महानगरपालिकेचे पैसे वाचून विशिष्ट ठेकेदार यांना लाभ मिळणार नाही. याकरिता निविदा प्रक्रिया मधील अटी शर्ती रद्द करून नवीन योग्य आणि सर्वसमावेशक अटी शर्ती टाकण्यात याव्यात आणि निविदा प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने नवीन निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी दिनांक ०२ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा एकदा निवेदनांच्या माध्यमातून मा.आयुक्त साहेब आपणांस करण्यात आली आपल्या वतीने संबधीत अधिकारी श्री.निलेश भदाने यांना मेलद्वारे कळविण्यातही आले पण आज ४ महिने होऊन सुद्धा संबधीत निविदा प्रक्रिया बाबत कोणताही निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आला नाही. यामुळे सदर खरेदी गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित आहे.
, दिनांक ०८.१०.२०२४ , ०८.११.२०२४ तसेच ०२.०१.२०२५ यावेळी निवेदनाच्या माध्यमातुन सदर निविदा ही ठराविक ठेकेदाराच्या फायद्यासाठी तयार करण्यात आली आहे तसेच भांडार विभागाचे उपायुक्त .निलेश भदाने यांचा टेंडर प्रकियेत सहभाग आहे त्यामुळे त्यांचे अधिकार काढून चौकशी करण्याची वेळोवेळी मागणी केली पण आपल्याकडून संबधीत अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई केली गेली नाही तसेच सदर निविदा ही गेल्या ८ महिन्यापासून का प्रलंबित आहे याची तपासणी सुद्धा करण्यात आली नाही. तरी सदर निविदा प्रक्रिया ही भांडार विभागाचे उपायुक्त श्री.निलेश भदाने यांच्या मुळेच पूर्ण झाली नाही आहे. मर्जीतील ठेकेदार पात्र व्हावा म्हणून त्याला डोळ्यासमोर ठेवून अटी शर्ती टाकण्यात आल्या मग जेव्हा निवेदनाच्या माध्यमातूनच मागणी केली तेव्हा अनुभव अटीत बदल केला आणि अटी शर्ती बदलल्या असे दाखविण्यात आले. पण खरे पाहता त्या ठेकेदाराला पात्र होता येईल अशा पद्धतीने ही निविदा बनविण्यात आली आणि तो ठेकेदार पात्र सुद्धा झाला पण जेव्हा कागदपत्रं सादर करण्यात आली तेव्हा सदर कागदपत्रं आणि अनुभव प्रमाणपत्र यात फेरफार करून ती बनावट, खोटी असल्याबाबत टेंडर लिपिक यांना शंका आल्याने त्याने सदर निविदा प्रक्रियाबाबत ( टेंडर फाईल वर शेरा देऊन ) उपायुक्त श्री.निलेश भदाने यांना कळविले आहे. तरी सुद्धा उपायुक्त श्री.निलेश भदाने हे कोणतेही कारवाई संबधीत निविदा बाबत अथवा ठेकेदाराच्या बाबत करत नसल्याने त्याच्या कामाबाबत शंका निर्माण होत आहे. तरी सदर निविदा पारदर्शक होण्यासाठी सदर निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवण्यात यावी तसेच विशिष्ठ किंवा ठराविक ठेकेदार यांना लाभ होण्याच्या हेतूने अटी शर्ती तयार करून टेंडर प्रक्रियेत रिंग करणाऱ्या भांडार विभागाचे उपायुक्त निलेश भदाने यांची चौकशी करण्यात यावी आणि या निविदा प्रक्रियेचे अधिकार त्यांच्या कडून काढून घेण्यात यावे. अशी मागणी राहुल कोल्हटकर यांनी केली आहे.