spot_img
spot_img
spot_img

पीसीसीओई मध्ये राज्यस्तरीय कॉर्फबॉल पंच मार्गदर्शन शिबिर संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र कॉर्फबॉल असोसिएशन आणि पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय, पुणे यांच्या मान्यतेने पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी व पिंपरी चिंचवड कॉर्फबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राज्यस्तरीय कॉर्फबॉल पंच मार्गदर्शन शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले. 
  पीसीसीओई, निगडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार अमित गोरखे आणि उद्योजक नरेंद्र लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
   आंतरराष्ट्रीय पंच डॉ. इ. बी. श्रीकांत, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ. अमेय काळे, माजी सचिव डॉ. उमेशराज पनेरू, डॉ. ज्ञानेश्वर चिमटे, सचिन ववले, ज्ञानेश पाटील आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. 
 डॉ. श्रीकांत यांनी मार्गदर्शन केले. उद्योजक नरेंद्र लांडगे यांनी सांगितले की, कॉर्फबॉल या मैदानी खेळामध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या तीन महाविद्यालयांचे संघ आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओई), पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) आणि एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन या संघांचा समावेश आहे. पीसीसीओईचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. संतोष पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीसीओई ची विद्यार्थिनी अपूर्वा हिंगमिरे हिने कॉर्फबॉल या खेळामध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. आगामी काळात हे तीनही संघ राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करतील असा विश्वास आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यातून ४२ पंचांनी व प्रमुख खेळाडूंनी सहभाग घेतला होता. समारोप सत्रात परीक्षा झाल्यानंतर सर्व सहभागी पंचांना राज्यस्तरीय पंच म्हणून मान्यता देऊन मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. 
    शिबिराच्या समारोप सत्रात धनुर्विद्या (आर्चरी) आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. रणजित चामले, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय कॉर्फबॉल पंच डॉ. श्रीकांत आदी उपस्थित होते. 
  शिबिराच्या आयोजनात डॉ. ज्ञानेश्वर चिमटे, प्रा. संतोष पाचारणे, सचिन ववले, प्रा. मिलिंद थोरात यांनी सहभाग घेतला. सर्व सहभागींचे व यशस्वी पंचांचे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!