जागतिक पर्यावरणा दिनानिमित्त गणेश भाजी मंडई येथे मध्ये व्यवसायिकांमध्ये प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमामध्ये सिंगल युज प्लास्टिक ऐवजी पर्यायी उपाययोजनांचा किंवा वस्तूंचा वापर करावा. यासाठी उपस्थित नागरिकांना व व्यवसायिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. जेणेकरून प्लास्टिकचा वापर कमी होईल. व कापडी पिशवी वापरण्यास नागरिक व व्यवसायिक प्रोत्साहित होतील. तसेच पर्यावरण संतुलित राहील. उपक्रम अधिकाधिक प्रभावशाली होण्यासाठी प्लॅस्टिक बंदीची शपथ देण्यात आली.या वेळी सौ. प्रियंकाताई बारसे (मा.नगरसेवक),शैलेंद्र सिह तवर ( आरोग्य निरीक्षक),विकास शिरवाळे सर( आरोग्य निरीक्षक),अमित पिसे (आरोग्य निरीक्षक),गौरव गायकवाड (आरोग्य निरीक्षक) उपस्थित होते.
उपक्रमाद्वारे नागरिकांना व दुकानदारांना काही सूचना देण्यात आल्या
•मार्केटमध्ये जाताना कापडी पिशवी घेऊन जाणे.
•दुकानदाराकडे कोणीही प्लास्टिक पिशवीची मागणी करू नये.
* तसेच आपल्या सोबत असणाऱ्या नागरिकांनाही कापडी पिशव्या वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
* फुड पॅकेजिंग करताना सिंगल प्लास्टिक पेक्षा पर्यायी संसाधनांचा वापर करणे जेणेकरून आपल्या आरोग्यास कोणती हानी होणार नाही याची काळजी घेणे.
* स्वतःपासून सुरुवात करा – नेहमी तुमची कापडी पिशवी आणि पाण्याची बाटली सोबत ठेवा.
या उपायांमुळे सिंगल युज प्लास्टिकचा वापर कमी होण्यास मदत होईल आणि आपले पिंपरी चिंचवड शहर अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनण्यास हातभार लागेल.सिंगल युज प्लास्टिक म्हणजे असे प्लास्टिक उत्पादने जी एकदा वापरून टाकून दिली जातात. यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, स्ट्रॉ, कप, चमचे, डबे, पॅकेजिंग फिल्म्स (रॅपर्स), थर्माकोल इत्यादींचा समावेश होतो. ही उत्पादने पर्यावरणात मोठ्या प्रमाणावर जमा होऊन प्रदूषण करतात, कारण त्यांना विघटित होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात.तसेच प्लास्टिक विघटित होताना मानवी जीवनावर व पर्यावणावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून शक्य तितका प्लास्टिकचा वापर टाळावा.
सिंगल युज प्लास्टिक शपथ
शपथ हा एक प्रतीकात्मक परंतु शक्तिशाली मार्ग आहे, जो व्यक्तीला आणि समुदायाला एका चांगल्या ध्येयासाठी एकत्र आणून प्रेरणादायी ठरतो म्हणून शपथ हा एक जनजागृती चा योग्य मार्ग आहे त्यातून एका वेळी अनेकांपर्यंत माहिती पोहचवली जाते.
या उपक्रमात युवक, नागरिक,स्थानिक गणेश भाजी मंडई व्यापारी असोसिएशन, पालिका कर्मचारी, मा. नगरसेवक बेसिक्स टीम यांनी सहभाग घेतला.