शबनम न्यूज | प्रतिनिधी
फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि ए.टी.एस.एस कॉलेज चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पर्यावरण दिनानिमित्त भोसरी एमआयडीसी टी ब्लॉक येथे वृक्षारोपण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मागील वर्षी लावलेल्या झाडांची स्वच्छता तसेच पर्यावरण संस्कार उद्यान येथे नवीन झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने उद्योजक आणि युवा आणि युवती उपस्थित होत्या तसेच या ठिकाणी परिसरातील कामगार वर्ग सुद्धा उपस्थित होते. यावेळी पर्यावरण संस्कार उद्यान वृक्षारोपण करत असतानाअभय भोर यांनी महानगरपालिकेला सदर उद्यानामध्ये अनेक औषधी वनस्पती आहेत आणि येणाऱ्या पिढीला शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या पर्यावरण संस्कार उद्यानातून वनस्पतीशास्त्राची पूर्ण माहिती मिळावी म्हणून महानगरपालिकेने सध्या ह्या उद्यानाची दूर अवस्था झाली असल्याने हे उद्यान विकसित करून शहरातील आणि राज्यातील तरुण-तरुणींना औषधी वनस्पती झाडांची माहिती देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
यावेळी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर ए.टी.एस.एस मुख्याध्यापक डॉ विश्वास स्वामी, उद्योजक जसबिंदर सिंग, उद्योजक अमोल स्वामी ,रूपाली जाधव ,दुर्गा भोर सोफियाम शेख, क्षितिज शिंदे, रोहन गावंड भूमी अकोलकर, दिशा बनवाल
व मोठ्या संख्येने उद्योजक युवा युवती उपस्थित होते