spot_img
spot_img
spot_img

मोरवाडी पिंपरी कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती व चौकाची दुरुस्ती करा – अलोक गायकवाड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील केएसबी चौकातून मोरवाडी पिंपरी कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती तसेच चौकाची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, उपाध्यक्ष अलोक गायकवाड यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, केएसबी चौक ते मोरवाडी पिंपरी दरम्यान रस्त्यावर सुरू असलेल्या मोठ्या कंपन्यांच्या बांधकामामुळे तसेच या रस्त्यादरम्यान येत असलेल्या एमआयडीसी भागामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक तसेच कामगारांची वर्दळ कायमस्वरूपी असते. या ठिकाणी आयुक्त निवास समोर असलेल्या चौकात सुरक्षित दुभाजक व वाहतूक नियंत्रण उपायोजना नसल्यामुळे हा चौक वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.

केएसबी चौकातील पुलावरून मोरवाडी पिंपरी कडे जाणाऱ्या रस्त्यावर आयुक्त निवास समोर असलेल्या चौकात दुभाजक तुटलेले आहेत तसेच या ठिकाणी उभारण्यात आलेल्या दुभाजकाची रचना चुकीची ठरत आहे. पिंपरी मोरवाडी कडून केएसबी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना या दुभाजकांमुळे अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा या दुभाजकांवर वाहने धडकून अपघात झालेले आहेत .या चौकातील दुभाजक काढून या ठिकाणी गोलाकार दुभाजक बसवण्यात यावेत, जेणेकरून केएसबी चौकाकडून मोरवाडी कडे जाणारे वाहने व मोरवाडी चौकाकडून केसरी चौकाकडे जाणारे वाहनांना योग्य ती दिशा दिसून वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित होईल या चौकात हायमास्ट दिवा व गती रोधक पांढरे पट्टे बसवल्याने रात्रीचा वाहनचालकांना होणारा त्रास कमी होईल .तसेच या चौकात वाहतूक नियंत्रण दिवे बसवण्यात यावेत व वाहतूक पोलीस ,वार्डन यांचे कायमस्वरूपी नेमणूक करावी जेणेकरून रहदारीला अडथळा, वाहतूक कोंडी असे प्रश्न या चौकात निर्माण होणार नाहीत व या रस्त्यावरील प्रवास सुरक्षित व सुखरूप होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!