शबनम न्यूज: प्रतिनिधी –
पिंपरी चिंचवड : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नक्षत्र बाग वृक्षारोपण सोहळा गुरुवार दिनांक 5 जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता ट्रान्सपोर्ट नगर हनुमान मंदिर, निगडी पिंपरी चिंचवड येथे भाजप प्राधिकरण चिंचवड मंडळाचे अध्यक्ष जयदीप खापरे यांच्या मार्गदर्शनात संपन्न होत आहे.
सदर वृक्षारोपण कार्यक्रमास भाजपाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे, विधान परिषद सदस्य आमदार उमाताई खापरे यांच्यासह माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, राजेंद्र बाबर ,सुशांत मोहिते, जगन्नाथ वैद्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.