शबनम न्यूज: प्रतिनिधी –
पिंपरी चिंचवड :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना खास बक्षीस देऊन त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक 6 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता थेरगाव परिसरातील स्वामी विश्व अपार्टमेंट, गणेश मंदिरासमोर हा भव्य दिव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. इयत्ता दहावी व बारावी मध्ये उल्लेखनीय गुण मिळणार्या विद्यार्थ्यांचा सन्मान या सत्कार समारंभात होणार आहे.
तसेच माजी नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 6 जून रोजी सकाळी नऊ ते पाच या कालावधीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून स्वामी विश्व अपार्टमेंट, गणेश मंदिरासमोर, थेरगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न होत आहे. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी आपले रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच माजी नगरसेविका मनीषा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते होणार आहे.
थेरगाव परिसरातील आदर्श माता-पित्यांचा गुणगौरव समारंभ या निमित्ताने होणार आहे.
तरी या सर्व उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा तसेच या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार यांनी केले आहे.