मोरेवस्ती चिखली मधील पायाभूत व मूलभूत समस्या सोडवा – विजय जरे
शबनम न्यूज
मोरेवस्ती चिखली मधील पायाभूत व मूलभूत समस्या सोडवा अशी मागणी स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय जरे यांनी मनपा प्रशासन कडे केली आहे. प्रभाग क्रमांक 1 मोरेवस्ती चिखली मधील पाणी,रस्ते,ड्रेजेन लाईन,आरोग्य समस्या या पायाभूत व मूलभूत आत्यावश्यक सेवा या विषयी असणाऱ्या समस्यां बाबत वारंवार तक्रार करून देखील तक्रारीचे निवारण व समस्या सोडविल्या गेल्या नाही जर अशा प्रकारे जाणून बुजून प्रशासन समस्यांकडे दुर्लक्ष करत असेल तर येथील कर दात्या नागरिकाने कर का भरावे? असा सवाल विजय जरे यांनी निवेदनातून विचारला आहे .
निवेदनात विजय जरे यांनी नमूद केले आहे कि मोरेवस्ती चिखली परिसरा मध्ये गेल्या अनेक वर्षा पासून समस्या वाढतंच चालेले आहे यांचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे. या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला संबंधित विभागाला वारंवार तक्रार ( कल्पना ) देऊन देखील यांच्या वरती ठोस अशी कोणतीहि उपाय योजना करण्यात आली नाही. तसेच आर्थिक लाभासाठी ठेकेदार मात्र पोसण्यात येत आहे. त्यामुळे प्रभागातील कर दाते नागरिक प्रशासनाच्या हलगर्जी कारभाराला वैतागलेले आहे.
या आत्यावश्यक व पायाभूत,मूलभूत सेवा सोडवत नसल्यामुळे कर दात्या नागरिकांकडून कर वसुली हे एक अन्याय आहे.येथील कर दात्या नागरिकांनी कर का भरावे हा प्रभागातील नागरिकांचा प्रश्न आहे. .तरीही जर का?? आपल्या प्रशासनाकडून येथील कर दात्या नागरिकांना आत्यावश्यक सेवा पुरवायचे नसेल तर आपल्या विभागाकडून फ क्षेत्रीय कार्यालय चे प्रमुख म्हणून आपण प्रभाग क्रमांक 1 येथील आत्यवश्यक,पायाभूत,मूलभूत सेवा सोडवत नसल्यामुळे आपणा कडूनच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त साहेबाना पत्र पाठवून या भागातील कर वसुली थांबून कायमची कर माफी करावे व कर दात्या नागरिकांना न्याय द्यावा असे विजय जरे यांनी निवेदनात नमूद केले आहे