spot_img
spot_img
spot_img

जनविकास प्रतिष्ठान वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात

शबनम न्यूज

जनविकास प्रतिष्ठान, विकासनगर-किवळे यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भव्य उत्सव विकासनगर येथे मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला.

संपूर्ण दिवसभर प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करत टी.सी कॉलनी, विकासनगर येथील चौकाचे “पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर चौक” असे नामकरण करण्यात आले आणि अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर केवळ येथील शासकीय कार्यालयात शासकीय नियमानुसार अभिवादन कार्यक्रम पार पडले.

सायंकाळी प्रतिष्ठानच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या पारंपरिक मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आणि संपूर्ण परिसर आनंदी आणि उत्साही वातावरणाने भरून गेला.

या भव्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते:
आमदार शंकर पांडुरंग जगताप, ज्येष्ठ सभागृह नेते नामदेव ढाके, रावेत-काळेवाडी मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, वालेकरवाडी मंडल अध्यक्ष मोहन राऊत,युवा नेते दीपक भोंडवे ,माजी नगर सेवक अभिषेक बारणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (देहूरोड) विक्रम बनसोडे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे मा. उपाध्यक्ष रघुवीर शेलार, बजरंग दल प्रांत सहसंयोजक , संदेश भेगडे, विश्व हिंदू परिषद भीमाशंकर जिल्हा प्रमुख प्रवीण फाकटकर, भाजपा पदाधिकारी श्री. उमेश सांडभोर, श्री. सुधीर साळुंखे, तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी मा. आमदार आणि युवा नेते दीपक भोंडवे यांच्या पारंपरिक धनगरी वेशभूषेत, घोंगडं व फेटा परिधान करून सन्मान करण्यात आला.

या प्रतिष्ठानचे आधारस्तंभ दिपक मधुकर भोंडवे यांच्याकडून प्रतिष्ठानला मागील अनेक वर्षापासून सहयोग करत आले आहेत.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रदिप भिसगे यांनी मा. आमदार श्री. शंकर जगताप यांच्यासमोर जाहीरपणे संपूर्ण प्रतिष्ठान एकजुटीने दिपक भोंडवे यांच्या पाठीशी उभे असल्याचे जाहीर केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप भिसगे आणि मा. नगरसेविका डॉ. मीनाताई ढोले यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात आलेल्या कार्याचे कौतुक केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!