spot_img
spot_img
spot_img

१० वी, १२ वीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांचा विधायक उपक्रम

शबनम न्यूज 

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी : दरवर्षी दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम घेतो. वर्षभर राबवल्या जाणाऱ्या अनेक कार्यक्रमांपैकी हा कार्यक्रम माझ्या अगदी जिव्हाळ्याचा आहे. कारण आपल्या पुढील पिढीचे, आपल्या समाजाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा मनस्वी आनंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतो, अशा भावना शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

यमुनानगर, निगडी सेक्टर 22 येथील दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत 70 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींचा गुणगौरव कार्यक्रम अपंग विद्यालय यमुनानगर निगडी येथे पार पडला. यामध्ये दहावी, बारावी परीक्षा पास झालेले अनेक गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच परिसरातील नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उबाळे बोलत होत्या.

कार्यक्रमाचे आयोजन युवासेना यमुनानगर शाखा यांच्या वतीने युवानेते अजिंक्य उबाळे यांनी संयोजन केले. प्रा. राजेद्र घोडके, ज्ञानप्रबोधिनीच्या माजी प्राचार्य प्रज्ञा पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, भोसरी विधानसभा प्रमुख शशिकला उभे, तुकाराम वारंग, अंकुश जगदाळे, गजानन ढमाले, आप्पा काळोखे, गणेश इंगवले, संतोष गायकवाड, प्रसाद फिरोदिया, राजेंद्र पळसकर, अमर पवार, सार्थक दोशी, किरण वाडकर, अनिकेत येरुणकर, अमित शिंदे, अभिषेक सुरवसे, आकाश खरात, सचिन मसने, दिगंबर निकम , प्रणव नागरे, दमयंती गायकवाड, संगीता दुपके, ममता कदम, कावेरी परदेशी, स्मिता मोगरे शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते

शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, युवानेते अजिंक्य उबाळे यांच्या प्रेरणातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देणे आणि त्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा होता.

करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन…
या समारंभाला परिसरातील शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, पालक व स्थानिक समाजमंडळांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनावर विशेष भर देण्यात आला. यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटन्टस् ऑफ इंडिया- पिंपरी चिंचवड चॅप्टर चे अध्यक्ष CMA अजित शिंदे आणि PD Committee चे अध्यक्ष CMA सागर मालपुरे यांना आमंत्रित केले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना CMA (Cost and Management Accountant) कोर्सबाबत सखोल मार्गदर्शन केले, कोर्सचे फायदे, करिअरच्या संधी व आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातील संभाव्य रोजगाराबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले आणि CMA अजित शिंदे व सागर मालपुरे यांनी त्यांची शंका दूर करत प्रभावी संवाद साधला. या कार्यक्रमात सुलभा उबाळे आणि अजिंक्य उबाळे यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ सन्मान मिळत नाही, तर त्यांना त्यांचे भविष्य घडविण्याची दिशा मिळते, असे सांगून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करत राहण्याचे आश्वासन दिले.

…या गुणवंतांचा केला गौरव
दहावीची गुणवतंत विद्यार्थी: कार्तिकी गणेश बनकर 98.40%, आर्या राजेश राव 97.00%, वरदा प्रदीप पिलवलकर 96.00%, संस्कार सुनील कदम 95.40%, शंतनु चंद्रशेखर नरवळे 95.20%, मधुरा प्रकाश कुलकर्णी 95.20%, समृद्धी अतुल पाटील 95.00%, सानिका गुरुदास पिसे 95.00%, बारावी गुणवंत विद्यार्थी: आदित्य उमेश देशपांडे 96.20%, सृष्टी प्रसन्न नहर 90.00%, सात्विक आशिष भाटिया 87.83% आदी.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!