शबनम न्यूज | प्रतिनिधी
युवा राजपूत प्रतिष्ठान,पुणे यांच्या वतीने राष्ट्रवीर महाराणा प्रताप यांची तिथी नुसार 485 वी जयंती नटसम्राट निळू फुले सभागृह,पिंपळे गुरव येथे आनंद उत्सवात साजरी करण्यात आली.संपूर्ण पुणे शहर मधून राजपूत समाज बांधव महाराणाजी प्रताप यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते.
कार्यक्रमस अध्यक्ष किशोरसिंह गिरासे भूषविले तर सुदामसिंह गिरासे व संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलित करून प्रख्यात वक्ते गीता उपासनी यांनी महारानाजी प्रताप यांचा जीवन पट आलेल्या समाज बांधवांना सविस्तर समजावून सांगितला.
या महाराणा प्रताप यांच्या 485 या जयंती निमित्तरक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 54 दानशूर नागरिकांनी रक्तदान केले परेश राजपूत यांनी या रक्तदानाची जबाबदारी पार पडली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगतसिंह देशमुख यांनी केले.तर किशोरसिंह गिरसे यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले.ज्ञानेश्वर राजपूत,जयदीप सिसोदिया, सचिन राजपूत,प्रशांत राजपूत,विक्रांत सोलंकी,भूपेंद्र राजपूत,सुनील चौधरी,हेमंत सिसोदिया सर्वांनी कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळली.देवेंद्र गिरासे,अमरसिंह राजपूत,धर्मेंद्र राजपूत असे इतर मान्यवर व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून जयंती साजरी केली.