शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 21 व 19 परिसरातील अनेक समस्यांबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत माजी उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी सकारात्मक चर्चा केली. पिंपरी परिसरात अनेक समस्या आहेत, या समस्याचे निराकरण लवकरात लवकर व्हावे, यासाठी हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांची महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या सोबत महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच या पिंपरी परिसरातील अनेक समस्या ज्या आहेत त्या सर्व समस्या सोडविण्याबाबत उपाययोजना त्वरित करण्यात येतील, असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त यांनी दिले या सकारात्मक चर्चेनंतर माजी उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी आयुक्तांचे आभार व्यक्त केले.
महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह व माजी नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यात झालेल्या बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच या समस्या सोडविण्यावरही उपाय योजनेबाबत कारवाई बाबत सकारात्मक चर्चा झाली.
१) पिंपरी विभागीय कर संकलन कार्यालय येथे कर्मचारी संख्या कमी असून, परिसरातील नागरिकांच्या तक्रारी निरस्त होत नसून, बऱ्याच प्रश्न कित्तेक महिन्यान पासून तशेच पेंडिंग आहेत. त्यासंदर्भात मा.आयुक्त सो यांना संगणक जाणकार कर्मचारी संख्या वाढवण्या बाबत मागणी केली.
२) पिंपरी येथील साई चौक ते अशोक थेटर रोड हा पूर्वी १२ मीटर होता परंतु आता नवीन डीपी मध्ये १८ मीटर केला असून सदर रस्ता पिंपरी येथील नागरिकांच्या रहदारी साठी मुख्य रस्ता आहेच. परंतु नवीन डीपी १८ मीटर मार्किंग प्रमाणे सदर रस्त्या लगत असलेल्या स्थानिक नागरिकांची दुकाने तसेच घरे अतिक्रमण (वाइंडिंग) होणार आहे. परंतु सदर ठिकाणी असणारे स्थानिक नागरिक गेले १९५५ पासून वास्तव्यास आहेत व व्यवसाय करत आहे. त्यांच्या मागणी प्रमाणे सदर रस्ता नवीन डीपी मध्ये जुन्या डीपी प्रमाणे १२ मीटरच करावा याबाबत आपल्या कडे मी प्रस्ताव दिला आहे. तसेच आमचे नेते व मार्गदर्शक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार साहेब यांच्या कडे देखील प्रस्थाव सादर केला आहे. तरी त्याची दखल घेत स्थानिक रहिवासी व व्यवसायीकांचा हिताचा विचार करून सदर प्रस्थाव मान्य करण्याबाबत विनंती केली.
३) पिंपरी येथे आमच्या सिंधी समाजाचा असणारा चालिओ उत्सव दरवर्षी मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. त्याअनुषंगाने पिंपरी येथील झुलेलाल नदी घाट हा कायम अस्वच्छ असून तेथे महापालिका कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्या बाबत निदर्शनास आणून दिले. तसेच चालिओ उत्सव चालू होण्यापूर्व संपूर्ण नदी गाठ साफ करण्याबाबतची मागणी केली.
४) पिंपरी तसेच पिंपरी-चिंचवड शहरा मधील असलेल्या झोपडपट्टी मधील ड्रेनेज लाईन अनधिकृत लगतच्या नदीमध्ये सोडलेले असून, त्याकारणे नदीचे पाणी दिवसेन दिवस घाण होत चाले आहे. त्याची दखल घेत त्यावरती काही उपयोजना करव्यात. जेणेकरून नदी सुद्धा बाधित होणार नाही व नागरिकांचे आरोग्य देखील चांगले राहील. याबाबत चर्चा केली.
५) पिंपरी प्रभाग क्र.२१ येथील परीसरा मध्ये असलेल्या उद्यानान मध्ये रोज हजारो नागरिक येत असतात त्यांची सुरक्षाची जबाबदारी महापालिका सुरक्षा रक्षकांची असून, त्याबाबत त्यांची नागरिकांकडून तक्रारी येत आहे. त्याबाबत संबंधित विभागास सूचना देण्याबाबत ची मागणी केली.
६) पिंपरी प्रभाग क्र.२१ व १९ मधील परीसरा मध्ये असणाऱ्यां ड्रेनेज लाईन व स्ट्रॉम वाँटर लाईन सध्या पडत असलेला अवकाळी पाऊस थांबला असून दोन्ही संबंधित विभागीय अधिकारी कर्मचारी यांना सांगून सदर लाईन सक्षम वाहनाने तसेच कर्मचाऱ्यान कडून साफ करण्यास सांगावे. जेणेकरून पावसाळा मान्सून मध्ये नागरिकांना त्रास होणार नाही. याबाबत चर्चा केली.
७) पिंपरी प्रभाग क्र.२१ व १९ मध्ये सध्य स्थिती मध्ये मोठे २ झाड पडल्याची घटना घडली आहे. कोणतेही जीवितहानी झाली नसून, तेथे असलेल्या व्यवसायीकांचे नुकसान झाले आहे. त्याचीच दक्षता घेता एक सक्षम टीम बनवून सदर परिसरामध्ये धोकादायक असलेल्या झाडांची पाहणी करून त्यांची छाटणी करण्याबाबत संबंधित विभागास सूचित करावे.
अशा प्रकारे पिंपरी येथील प्रभाग क्र.२१ व १९ परिसरातील नागरिकांच्या सुरक्षतेच्या व समस्यांची दखल घेत महत्वाच्या मुद्यांवर सकारात्मक चर्चा केली.