spot_img
spot_img
spot_img

मधुकर बच्चे युवा मंच वतीने इंडोनेशियात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैशाली देशमाने यांचा सन्मान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

इंडोनेशिया येथे योगा स्पर्धा आयोजित केली होती. या मध्ये ट्रेडिशनल योगा व आर्टिस्टिक योगा याचे चिंचवड मधील श्रीहरी योगाच्या संचालिका वैशाली देशमाने यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे या स्पर्धेत देशमाने यांनी प्रथक क्रमांक मिळवून इडोनेशियात भारताचे नाव गाजविले व पिंपरी चिंचवड मधील जनतेनेही अभिमान व्यक्त केला.

या स्पर्धेत पाच देश सहभागी झाले होते.या दोन्ही स्पर्धेत अतिशय जिद्दीने व भारताचे नावलौकिक हे डोळ्यासमोर ठेऊन वैशाली देशमाने यांनी सुवर्ण पदके मिळाली त्यांच्यावर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मधुकर बच्चे युवा मंच वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मधुकर बच्चे,डॉ. ज्योती सलगरकर , रोहिणी बच्चे,मंगला डोळे – सपकाळे ,शोभा लुकर,गणेश बच्चे,आदिनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
वैशाली देशमाने यांनी अत्यन्त आभिमानास्पद कामगिरी करून भारताचे नाव आणखी उच्च केले आहे.

त्यांचा या स्पर्धेतील त्यांचा सर्व प्रवास, खडतर अनुभव,व मिळालेले आभिमानस्पद यश यावर आमचा संवाद झाला. त्यांच्या गुरु डॉ.ज्योती सलगरकर यांना याचे बरेच श्रेय आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. आम्हा सर्वांना खूपच आभिमान वाटला. देशमाने यांचे करावे तेवढे कौतुक कमीच कारण त्या उत्तम गृहिणी,असून त्या अतिशय प्रामाणिकपणे योगा वर्ग चालवत आहेत.व हे करीत त्या या विविध स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन करून योगा व भारताचे नावात मानाचे तुरे रोवत आहेत हे आम्हा चिंचवडकरांना पण आभिमान आहे.मधुकर बच्चे युवा मंच वतीने देशमाने यांना भविष्यात जिथे आवश्यकता वाटेल तिथे मदत करण्याचा प्रयत्न राहील.

तसेच पिंपरी चिंचवड मधील रहिवाशी असल्यामुळे भारताबाहेर पिंपरी चिंचवडचे नावलौकिक केल्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने त्यांचा सन्मान झालाच पाहिजे आयुक्तांनी याची नक्की दखल घेतली पाहिजे अशी मागणी मधुकर बच्चे युवा मंच वतीने केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!