spot_img
spot_img
spot_img

शिवसेना पक्षातर्फे विविध मतदार संघात व्यसनांची जाहीर होळी.

जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त शिवसेना पक्षातर्फे पुण्यातील विविध विधानसभा मतदार संघात तंबाखूजन्य व्यसनांची जाहीर होळी करण्यात आली. कोथरूड, खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी, येरवडा, गुडलक हॉटेल चौक अशा विविध ठिकाणी व्यसनांच्या होळीचे आयोजन शिवसेना पक्षातर्फे करण्यात आले.

 या विविध कार्यक्रमात व्यसन विरोधी चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती दिली. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचा वर्ग हा व्यसना कडे ओढत चालला आहे , आणि याकडे दुर्लक्ष होत आहे. सरकारने जे जे लोक तंबाखू, गांजा, अमली पदार्थ पीक घेतात त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांची शेती जप्त करावी. तसेच छोट्या छोट्या  विक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं अशा कारखानदारांना कडक शासन देऊन त्यांची सर्व मालमत्ता जप्त करावी! या धुम्रपान वनस्पतीचा पाला कुठलाही प्राणी, जनावर खात नाही तरी माणूस का खातो? हे जनावरांना समजत पण माणसांना समजत नाही असे डॉक्टर गंगवाल म्हणाले.

          पुणे महानगर प्रमुख व माजी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले   शिवसेनेच्या वतीने आम्ही पुण्यामध्ये या धुम्रपान, ड्रग्ज आणि तंबाखूच्या विरोधात कायम आंदोलन करत राहू व जिथे जिथे ड्रग्ज सारख्या वस्तूंच प्रोडक्शन असेल तिथे छापे टाकून पोलिसांच्या मार्फत कारवाई करत राहू व तरुणांना या व्यसनापासून रोखण्याचा प्रयत्न करू. व्यसनमुक्ती क्षेत्रात गेली ४० वर्षे काम करणारे डॉ. कल्याण गंगवाल यांना पद्मश्रीने गौरविण्यात यावे असा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना देत असून पुढे केंद्र शासनाकडे देखील त्याची शिफारस होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे ते म्हणाले.

          येरवडा येथील कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे हेमंत बत्ते, हडपसर येथे शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे, गुडलक चौक  येथे युवा सेना राज्य सचिव किरण साळी, खडकवासला येथे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, कोथरुड येथे श्रीछत्रपती शिवाजीमहाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यासमोर उदय भेलके आदींनी व्यसनांच्या होळीचे भव्यतेने आयोजन केले. यावेळी सुधीर जोशी, अविनाश खेडेकर, निलेश गिरमे, सुदर्शना त्रिगुणाईत राजाभाऊ चौधरी ,शंकर संगम ,उद्धव गलांडे ,विनोद करतात ,उदय खांडके मनोज अष्टेकर, रमेश साळुंखे, श्याम ताठे तसेच हडपसर व खडकवासला येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      कार्यक्रमाची सांगता आम्ही व्यसन करणार नाही याची शपथ घेऊन सिगारेट, तंबाखू याची होळी करून करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!