पिंपरी, ३१ मे २०२५ :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या युध्दनितीनिपुण,उत्कृष्ट प्रशासिका,मुत्सद्दी आणि जनहिताच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या आदर्श राज्यकर्त्या होत्या, त्यांनी आपल्या कारकीर्दीत जनकल्याण, न्यायव्यवस्था आणि विकासात्मक योजना प्रभावीपणे राबवल्या. त्यांच्या याच लोककल्याणकारी धोरणांचा आदर्श घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची वाटचाल सुरु असल्याचे मत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे,आमदार अमित गोरखे, उमा खापरे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगर सदस्य शत्रुघ्न काटे, राजू दुर्गे, मारुती भापकर, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता नितीन देशमुख, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्त्या विना सोनवलकर, सोनाबाई गडदे, सामाजिक कार्यकर्ते युवराज दाखले, पोपट हजारे, विठ्ठल देवमाने, विजय भोजने, दीपक भोजने, गणेश भांडवलकर, ज्ञानेश्वर गोजावले, आदी उपस्थित होते.
तसेच पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उप आयुक्त सचिन पवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते युवराज दाखले, मच्छिंद्र चिंचोले, शिवाजीराव खडसे, मनोज मोरे, संजय कांबळे, रघुनाथ मलिशे, यशराज चिंचोले तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
तर सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी नगर सदस्य प्रशांत शितोळे, सागर अंघोळकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.