spot_img
spot_img
spot_img

वाकड पोलिसांनी गहाळ आणि चोरी झालेले ४० लाखांचे १३७ मोबाईल मूळ मालकांना केले परत

पिंपरी- चिंचवड: वाकड पोलिसांनी गहाळ आणि चोरी झालेले ४० लाखांचे १३७ मोबाईल मूळ मालकांना परत केले आहेत. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ आणि चोरी झालेले मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधित व्यक्तींना कायद्याचा धाक दाखवून परत मिळवले आहेत. ही कामगिरी वाकड पोलिसांनी केली आहे. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या हस्ते मूळ मालकांना मोबाईल परत देण्यात आले. एकदा गहाळ आणि चोरी गेलेला मोबाईल परत मिळणं अवघडच आहे. पण, पोलिसांनी मनावर घेतल्यास अशा पद्धतीने ही मोबाईल मिळू शकतात हे त्याचं उदाहरण आहे. अनेकदा बाजारात, शतपावली करत असताना, बस प्रवास करत असताना, गर्दीच्या ठिकाणी चोरटे संधी साधून मोबाईल लंपास करतात. कधी स्वतः कडून मोबाईल गहाळ होतो. अशा वेळी केवळ आपण पोलिसात तक्रार देऊ शकतो.

वाकड पोलिसांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल ट्रेस केले. १३७ पैकी अनेक मोबाईल हे कर्नाटक, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश ट्रेस झाले. संबंधित व्यक्तीशी पोलिसांनी संपर्क करून कायद्याचा धाक दाखवून त्या- त्या राज्यात जाऊन हे मोबाईल जप्त केले आहेत. काहींनी हे मोबाईल कुरिअर देखील केले आहेत. वाकड पोलिसांनी १३७ मोबाईल मूळ मालकांना परत केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!