spot_img
spot_img
spot_img

बकरी ईद सणाचे महत्व लक्षात घेऊन नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे – आयुक्त शेखर सिंह

बकरी ईद निमित्त आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली नियोजन बैठक

पिंपरी,  : बकरी ईदच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे सर्व संबधित विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावीअसे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले. बकरी ईद सणाचे महत्व लक्षात घेऊन नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन  आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनपोलीस यंत्रणा आणि शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत पिंपरी येथील महापालिका मुख्य कार्यालयातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहामध्ये आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झालीत्यावेळी ते बोलत होते.

  यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटेतृप्ती सांडभोर,  मुख्य अभियंता संजय कुलकर्णीसह शहर अभियंता देवण्णा गट्टूवारअजय सूर्यवंशीनितीन देशमुखउप आयुक्त संदिप खोतसचिन पवारमुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडेविशेष अधिकारी किरण गायकवाडमुख्य पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडेकार्यकारी अभियंता हरविंदर  बन्सलप्रेरणा सीनकरसुनीलदत्त नरोटेबी.पी. लांडे आदी उपस्थित होते. तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरेवरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कडलगगणेश जामदार कुरेशी संघटनेचे रफिक कुरेशीगफूर कुरेशीयुसुफ कुरेशी,वाहिद कुरेशीहमीद कुरेशीमुबीन शाबीर कुरेशीशादाब फैय्याज कुरेशीशकील कुरेशी यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महापालिकेने तयार केलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील कुर्बानीच्या ठिकाणी  पुरेशा पाण्याचा पुरवठा पुरेसे मनुष्यबळ नेमणूक तसेच वेस्ट उचलण्यासाठी आवश्यक यंत्रणास्वच्छता या सर्व बाबीचे व्यवस्थिपणे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्त सिंह यांनी संबधित विभागांना दिले. तर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

बकरी ईदसाठी महापालिकेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपातील पत्राशेड आणि मंडप उभारण्यात येणार आहे. कुर्बानीच्या ठिकाणी आवश्यक साहित्यमोबाईल टॉयलेट व्हॅन इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी आणण्यात आलेल्या जनावरांना ठेवण्यासाठी पुरेशा जागेची तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. बकरी ईदसाठी आवश्यक पाणी पुरवठ्यासाठी  टँकर आणि स्वतंत्र हौद असतील. कुर्बानीनंतर निर्माण होणारे वेस्ट तात्काळ उचलण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रणांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही सर्व व्यवस्था करण्यात आली असून आवश्यक पोलीस यंत्रणा देखील याठिकाणी असणार आहे. कुर्बानी साठी नेहरू नगर डॉक पॉइंट येथील जागा निश्चित करण्यात आली आहेअशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी यावेळी दिली.

 

पाण्याचा पुरवठा अधिक प्रमाणात करण्यात यावागुरे बांधण्यासाठी अधिकची जागा उपलब्ध करून द्यावीमंडपाच्या किंवा पत्राशेडच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यात यावी आदी मागण्या यावेळी बैठकीत उपस्थित संघटनांच्या प्रतिनिधींच्या वतीने करण्यात  आल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!