spot_img
spot_img
spot_img

चऱ्होलीकर भूमिपुत्रांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!

प्रस्तावित टीपी स्कीम रद्द केल्यामुळे आनंद

पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेली टीपी स्कीम रद्द करण्याची सूचना प्रशासनाला केली. त्यामुळे प्रशासनाने कार्यवाही स्थगित केली. यामुळे मौजे चऱ्होली येथील ग्रामस्थ, शेतकरी आणि भूमिपुत्रांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चऱ्होलीकरांनी भेट घेतली आणि टीपी स्कीम रद्द करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबाबत आभार व्यक्त केले. तसेच, आमदार महेश लांडगे यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द खरा केला. भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी कायम कठोर भूमिका घेतल्याबद्दल आमदार लांडगे यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

यावेळी शहराचे माजी महापौर नितीन काळजे, सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजपाच्या सत्ताकाळात समाविष्ट गावांमधून भाजपाचा पहिला महापौर म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. प्रशासकीय राजवटीमध्ये आम्हा भूमिपुत्रांवर टीपी स्कीम लादण्याचा प्रयत्न केला जात होता. याबाबत भूमिपुत्रांनी एकजुट केली आणि आंदोलन उभा केले.

दरम्यान, आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करुन महापालिका प्रशासनाला सूचना करण्यास सांगितले. त्यानुसार, फडणवीस यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसारच, टीपी स्कीम राबवण्याची कार्यवाही स्थगित करण्यात आली. येत्या महापालिका सभेत त्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल आणि त्यानंतर अधिकृत ‘नोटिफिकेशन’ काढण्यात येणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!