spot_img
spot_img
spot_img

मनपा वैद्यकीय विभागाच्या वतीने खरेदी निविदा प्रक्रिया चौकशी व्हावी, राहुल कोल्हटकर यांची मागणी

मनपा प्रशासनाच्या कारभारावर शंका उत्पन्न करत राहुल कोलाटकर यांचे निवेदनात अनेक धक्कादायक खुलासे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभाग आणि यशवंतराव चव्हाण रुग्णालय वैद्यकिय भांडार विभागाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या साहित्याची तपासणी तसेच निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी केली आहे. महानगरपालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात राहुल कोल्हटकर यांनी अनेक धक्कादायक खुलासे करीत मनपाच्या खरेदी निविदा प्रक्रियेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत राहुल कोल्हटकर यांनी आपल्या निवेदनात पुढील बाबींचा समावेश करत निविदा प्रक्रियेच्या चौकशीची मागणी केली आहे

१. पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभाग आणि यशवंतराव चव्हाण रुग्णालय वैद्यकिय भांडार यांच्या वतीने जे वैद्यकिय साहित्य खरेदी करण्यात येते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य दर्जात बदल करून निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी करून मोठ्या प्रमाणात गैरकारभार होत असल्याबद्दल.

२. निविदा प्रक्रिया राबविताना सर्व पुरवठादार यांची एक प्रि- बिड मीटिंग होऊन खरेदी करण्यात येणाऱ्या साहित्याच्या दर्जाबाबत एक अहवाल आयुक्त साहेब, डीन , वैद्यकिय अधिकारी यांच्या मान्यतेने तयार करण्यात येतो त्याच अहवालाच्या तपशीलानुसार (मनांक/गुणांक) साहित्य पुरवठा झाला आहे का ? हे पाहण्यासाठी सर्व नवीन खरेदी साहित्य यांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश तांत्रिक दक्षता समिती यांना देण्याबाबत.

३. वैद्यकिय साहित्य खरेदी बाबत ज्या निविदा काढण्यात येतात त्या निविदा प्रक्रियेत अनेक नामांकित कंपन्या प्रि-बिड मध्ये सहभागी होत असतात निविदा प्रक्रियेत सुद्धा सहभागी होतात पण प्रत्यक्षात जेव्हा निविदा प्रक्रिया राबवण्यात येते तेव्हा प्रि- बिड अमेंतमेंट अहवाल बाजूला ठेवून मर्जीतल्या पुरवठादार कंपनीसाठी सहकार्य होईल असा साहित्य तपशील इतर पुरवठादार यांना दाखवून त्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रतिबंध घातला जात आहे.त्यामुळे कोणत्याही वस्तूची खरेदी करताना निविदा प्रक्रिया प्रि बिड अमेटमेंट अहवाल नुसार खरेदी करण्यात यावी अथवा प्रि- बिड अमेटमेंट अहवाल यानुसार निविदा प्रिक्रिया राबविण्याचे आदेश सर्व विभाग यांना देण्याबाबत.

४. वैद्यकिय विभाग यांच्या वतीने ज्या ७ सोनोग्राफी मशीन खरेदी करण्यात आल्या होत्या त्या निविदा प्रक्रिया प्रि- बिड अमेंतमेंट अहवालाच्या नुसार नसल्याने त्या रद्द केल्याबाबत वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफने यांनी माहिती दिली. सदरचे प्रकरण वैद्यकिय विभागातील अधिकारी तसेच पुरवठादार यांचे हितसंबंध तसेच गैरव्यवहार अधोरेखित करीत असल्याने सदर सोनोग्राफी मशीन खरेदी प्रक्रिये सबंधित सर्व विभागीय अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून मनपाची फसवणूक प्रकरणी संबधित अधिकारी यांना बडतर्फ करण्यात यावे तसेच ज्या पुरवठादार यांनी यांचा पुरवठा केला आहे त्या पुरवठादार कंपनीला काळया यादीत टाकण्यात यावे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यावतीने शहरातील वैद्यकिय विभाग तसेच रुग्णालये यांच्या करिता मोठ्या प्रमाणात निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून साहित्य खरेदी करण्यात येत आहे. सध्या ३ वर्षापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकीय राजवटीत वैद्यकिय विभाग तसेच शहरातील रुग्णालये यांच्या करिता मोठ्या संख्येने विविध आधुनिक उपकरणे यांची खरेदी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भांडार विभाग तसेच यशवंतराव चव्हाण रुग्णालय वैद्यकिय भांडार विभाग यांच्या देखरेखीखाली किंवा मार्गदर्शनाखाली निविदा प्रक्रिया राबवण्यात येऊन कोट्यावधी रुपयांची साहित्य खरेदी करण्यात आली. पण गेल्या काही दिवसात वैद्यकिय साहित्य खरेदी मध्ये मोठ्या प्रमाणात चूकीचे साहित्य पुरवठा होत आहे हे निदर्शनात आल्यामुळेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने ज्या नवीन ७ सोनोग्राफी मशीन खरेदी करण्यात आल्या त्याच्या दर्जाबाबत शंका निर्माण झालेली असल्याने सदर मशीन ह्या प्री बिड अमेंतमेंट अहवाल नुसार खरेदी करण्यात आल्या नव्हत्या म्हणूनच दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी सदर सोनोग्राफी मशीन ह्या प्री बिड अमेटमेंट अहवाल नुसार खरेदी केल्या आहेत का ? जर प्रि बिड अहवाल नुसार खरेदी केल्या असतील तर त्याबाबत अहवाल द्यावा अशी वैद्यकिय अधिकारी डॉ लक्ष्मण गोफणे यांची भेट घेऊन निवेदन देऊन मागणी केली. त्यांनंतर दिनांक १४ मे रोजी पुन्हा भेट घेतली असता सदर सोनोग्राफी मशीन ह्या प्रि बिड अहवाल नुसार नसल्याने रद्द करून नव्याने मागविण्यात येणार आहे त्या आल्यानंतर त्याबाबतचा अहवाल आपल्याला देण्यात येईल असे वैद्यकिय अधिकारी यांनी सांगितले. थोडक्यात काय तर सदर चुकीच्या मशीन खरेदीबाबत जर प्रश्न उपस्थित केला नसता तर सदर खरेदी करून पुरवठा झालेल्या मशीन ह्या मनपाच्या वैद्यकिय विभाग यांनी वापरायला सुरुवात केली असती आणि थोड्या दिवसांनी त्यात काही तांत्रिक अडचणी दाखवून याच मशीन कुठे तरी धूळखात टाकून नव्याने अजून अशाच सोनोग्राफी मशीन खरेदी करण्याबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असती आणि पुन्हा यातून अधिकारी यांनी स्वतःचे हात ओले केले असते. त्यामुळे प्रि बिड अमेंतमेंट अहवाल हा आयुक्त , डीन तसेच वैद्यकिय अधिकारी यांच्या मान्यतेने तयार होत असतो आणि त्याच तपशीलात साहित्य खरेदी करणे आवश्यक असते पण सोनोग्राफी मशीन खरेदी बाबत हे कोणतेच नियम पाळण्यात आले नाही असे दिसून येते म्हणूनच तर मशीन खरेदी योग्य पद्धतीने झाली आहे का ? याबाबत अहवाल मागितला असता सदर मशीन खरेदी रद्द केली आहे.त्यामुळे सोनोग्राफी मशीन खरेदी निविदा प्रक्रियेत अधिकारी , पुरवठादार यांचे हितसंबंध तसेच गैरव्यवहार अधोरेखित होत असल्याने सदर सोनोग्राफी मशीन खरेदी प्रक्रियेत सबंधित सर्व विभागीय अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून मनपाची फसवणूक प्रकरणी संबधित अधिकारी यांना बडतर्फ करण्यात यावे तसेच ज्या पुरवठादार यांनी यांचा पुरवठा केला आहे त्या पुरवठादार कंपनीला काळया यादीत टाकण्यात यावे. अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातुन मा. आयुक्त साहेब यांना करण्यात येत आहे.

तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभाग आणि यशवंतराव चव्हाण रुग्णालय वैद्यकिय भांडार यांच्या वतीने जे वैद्यकिय साहित्य खरेदी करण्यात येते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य दर्जात बदल करून निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी करून मोठ्या प्रमाणात गैरकारभार होत आहे हे दिसून येत आहे. कोणत्याही वस्तूची निविदा प्रक्रिया राबविताना सर्व सहभागी होणाऱ्या पुरवठादार यांची एक प्रि- बिड मीटिंग होऊन खरेदी करण्यात येणाऱ्या साहित्याच्या दर्जाबाबत एक अहवाल आयुक्त साहेब, डीन , वैद्यकिय अधिकारी यांच्या मान्यतेने तयार करण्यात येतो त्याच अहवालाच्या तपशीलानुसार (मनांक/गुणांक) साहित्य पुरवठा करावा लागतो पण सध्या वैद्यकिय साहित्य खरेदी बाबत ज्या निविदा काढण्यात येतात त्या निविदा प्रक्रियेत अनेक नामांकित कंपन्या प्रि-बिड मध्ये सहभागी होत असतात आणि त्याच कंपन्या निविदा प्रक्रियेत सहभागी सुद्धा होतात पण प्रत्यक्षात जेव्हा निविदा प्रक्रिया राबवण्यात येते तेव्हा प्रि- बिड अमेंतमेंट अहवाल बाजूला ठेवून मर्जीतल्या पुरवठादार कंपनीसाठी सहकार्य होईल असा साहित्य तपशील तयार करून तो इतर पुरवठादार यांना दाखवून त्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रतिबंध घातला जात असल्याने यात मोठ्या प्रमाणात रिंग करून साहित्य यांच्या दर्जाबाबत तडजोड केली जात आहे.

त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभाग आणि यशवंतराव चव्हाण रुग्णालय वैद्यकिय भांडार विभागाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या सर्व साहित्याची तपासणी तसेच निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यात येऊन या निविदा प्रक्रिया राबविताना अथवा त्यांचे साहित्य पुरवठा होताना ते साहित्य हे आयुक्त साहेब, डीन , वैद्यकिय अधिकारी यांच्या मान्यतेने तयार करण्यात आलेल्या प्रि बिड अनेमटमेंट अहवालाच्या तपशीलानुसार (मनांक/गुणांक) त्या वस्तूच्या साहित्य यांचा पुरवठा झाला आहे का नाही ? अशी शंका निर्माण झाली असल्याने याची तपासणी करण्यात यावी यासाठी वैद्यकिय विभाग मध्ये ज्या खरेदी करण्यात आलेल्या सर्व नवीन खरेदी साहित्य यांची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश तांत्रिक दक्षता समिती यांना देण्यात यावे अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातुन करीत आहे.

सदर निवेदनाच्या माध्यमातून उल्लेख केलेल्या शंका ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्या वस्तू खरेदी करते त्याच्या दर्जाबाबत असल्याने यापुढे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या विभागांच्या करिता कोणत्याही वस्तूची खरेदी करताना ती खरेदी ही निविदा प्रक्रिया प्रि बिड अमेटमेंट अहवाल नुसारच करण्यात यावी अथवा प्रि- बिड अमेटमेंट अहवाल यानुसार निविदा प्रिक्रिया राबविण्याचे आदेश सर्व विभाग यांना लवकरात लवकर देऊन एक पारदर्शक कारभारासाठी सर्व अधिकारी यांना सूचना देण्यात याव्या अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातुन श्री.शेखर सिंह साहेब , आयुक्त ,यांना करण्यात येत आहे.

निवेदनाच्या माध्यमातुन उल्लेख करण्यात आलेले विषय हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश सन्माननीय आयुक्त हे द्यावेत तसेच सोनोग्राफी मशीन खरेदी बाबत ज्या चुकीच्या पद्धतीने कारभार केला गेला त्याची खातेनिहाय चौकशी करून संबंधित अधिकारी पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राहुल कोल्हटकर यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!