पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी :
वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे. अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस चे नेते विजय वडेट्टीवर यांनी दिली आहे. विजय वडेट्टीवार यांनी कस्पटे कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबातील सदस्यांच सांत्वन केलं. घटनेची माहिती घेतली.
वैष्णवीला क्रूर मारहाण झाली आहे. ज्या पद्धतीने वैष्णवीला मारहाण करण्यात आली ते पाहता हगवणे कुटुंब हे राक्षसी प्रवृत्तीचे आहे. वैष्णवीचा हगवणे कुटुंबाने जीव घेतला आहे. अशा प्रवृत्तीला माफ करू शकत नाही. त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे. असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे. विजय वडेट्टीवार हे पत्रकारांशी बोलत होते. विजय वडेट्टीवार म्हणाले, महिलांवर अत्याचाराच्या प्रमाणात महाराष्ट्र सगळ्या राज्यांच्या पुढे गेल आहे. महिलांच्या, मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भात मागील पाच वर्षात ६६ हजार महिला बेपत्ता आहेत. दर दोन तास तेरा मिनिटांमध्ये एका महिलेचा खून होतो, किंवा तिच्यावर अत्याचार होतो. ही सगळी परिस्थिती बघता राज्यात कायद्याचा जो धाक राहिला नाही . महाराष्ट्र अधोगतीला चालल्याचे हे निदर्शन आहे. राज्याच्या महिला आयोगाला पूर्ण वेळ दिला पाहिजे. . पुढं ते म्हणाले, या प्रकरणाची संपूर्ण माहिती आपण कुटूंबाकडून घेतली. कुर मारहाणीचे ते सर्व फोटो पाहिले. ज्या पद्धतीने वैष्णवीला मारहाण झाली ते पाहता हगवणे कुटूंब माणूस नाही, राक्षस आहेत. मानवतेला काळीमा फासणारे कृत्य त्या नालायक कुटूंबाने केले आहे. नऊ महिन्याचे बाळ असताना कोणीही आत्महत्या करू शकत नाही. तिला मारून तिचा जीव घेतला आहे. पोलीसांचा तपासही त्या दिशेने झाला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत हगवणे कुटूंबासारख्या राक्षसी प्रवृत्तीला माफ करता कामा नये त्यांना फाशी देण्यात यावी असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले