spot_img
spot_img
spot_img

राजेंद्र हगवणेला २८ मे पर्यंत पोलीस कोठडी!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जमीन खरेदीसाठी माहेरहून दोन कोटी रुपये आणण्यासाठी सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या प्रकरणात पसार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मुळशीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे आणि त्यांचे चिरंजीव सुशील हगवणे यांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एन. एच. बारी यांनी पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

वैष्णवी यांच्या आत्महत्येनंतर हगवणे पिता-पुत्र पसार झाले होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्यांना शुक्रवारी अटक केली. त्यानंतर शिवाजीनगर सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले त्यावेळी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३, रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम) हिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तिचे वडील आनंद ऊर्फ अनिल बाळासाहेब कस्पटे (वय ५१, रा. वाकड) यांनी बावधन पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वैष्णवीचा पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा यांना १८ मे रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, वैष्णवीचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे हे दोघे पसार होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!