शबनम न्यूज | प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण अवघ्या महाराष्ट्राला माहीत झाले आहे. सासरच्या व्यक्तींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. वैष्णवीचा प्रेम विवाह होता. वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी इतर मुलींना प्रेमात न पडण्याचा सल्ला दिला आहे. मुलींनी प्रेमात पडू नये, अशी त्यांनी कळकळीची विनंती केली आहे. अनिल कस्पटे हे पत्रकारांशी बोलत होते.
अनिल कस्पटे यांनी तरुणींना एक कळकळीची विनंती केली आहे. ते म्हणाले, मुलींना माझं एक सांगणं आहे. प्रेमात पडताना विचार करून प्रेम करा. समोरच्या व्यक्तीची माहिती काढा. पार्श्वभूमी तपासा, त्याची परिस्थिती काय आहे, वागणूक आणि बोलणं कसं आहे, ते बघा. कुणी तुम्हाला भुरळ घालू नये. अन्यथा माझ्या मुलीसोबत जे घडलं ते तुमच्यासोबत घडू नये. मुलींना एक कळकळीची विनंती आहे. तुम्ही प्रेमात पडू नका. आई वडिलांचा विचार,सल्ला घेऊन लग्न करा. आई- वडील म्हणतील त्यांच्याशी लग्न करा, असं अनिल कस्पटे यांनी आवाहन केलं आहे.