spot_img
spot_img
spot_img

खासदार श्रीरंग बारणे यांची नेरळ, कर्जत रेल्वे स्टेशनला भेट ; रेल्वे स्टेशनवरील कामांची घेतली माहिती

शबनम न्यूज | प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदारसंघातील नेरळ रेल्वे स्टेशन सुधारण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून काम सुरु आहे. त्यातून रेल्वे स्टेशनचा सुधार केला जात आहे. दोन लिफ्ट, सरकते जिने,  रेल्वे स्टेशनवर बैठक कक्ष, लिफ्ट, पार्कींगची व्यवस्था, स्वच्छतागृह आणि रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असल्याचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
खासदार बारणे यांनी काही दिवसांपूर्वी पुणे विभागात येणा-या रेल्वे स्टेशनला भेट दिली होती. त्यानंतर शुक्रवारी मुंबई विभागात येणा-या कर्जत, नेरळ रेल्वे स्टेशनला भेट दिली. रेल्वे स्टेशन सुधारणा, दर्जेदार कामे करण्याबाबत अधिका-यांना सूचना दिल्या. या वेळी वरिष्ठ अभियंता नझीब जी, व्यवस्थापक अजय कुमार, पी एम प्रकाश, व्ही जी अल्लूरे, एस के यादव, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोषशेठ भोईर, शिवसेना तालुका प्रमुख  सुदाम पवळी,भाजपा तालुकाध्यक्ष राजेश भगत, मनोहर थोरवे, माजी नगरसेवक संकेत भासे, माजी सभापती राहुल पिसे,शिवसेना नेरळ शहर प्रमुख किसन शिंदे, युवासेना विधानसभा प्रमुख प्रसाद थोरवे, सुरेश राणे अंकुश दाभणे, दिलीप ताम्हाणे, रमेश मते व मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, नेरळ रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. काम वेगात सुरु आहे. या कामावर प्रवासी संघटनेनेही समाधान व्यक्त केले.  पावसाळ्यात नेरळ स्टेशन परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये  पाणी शिरते. या पाण्याचा निचरा करण्याची  व्यवस्था रेल्वे आणि ग्रामपंचायतीने करावी. विकास प्राधिकरणाला विश्वासात घ्यावे. स्ट्रॉम वॉटरची व्यवस्था करावी. नेरळ ते कर्जत दरम्यान लोकल रेल्वेने प्रवास केला. कर्जत रेल्वे स्टेशनचीही पाहणी केली. तेथील असुविधांची माहिती घेतली. त्या समस्या सोडविण्याचे निर्देश अधिका-यांना दिले. पनवेल ते कर्जत दरम्यान नवीन रेल्वे मार्ग होत आहे. त्यामुळे कर्जत येथे नवीन स्टेशन उभारण्यात येत आहे. जुन्या स्टेशवनरुन एक्सप्रेस धावतात. त्यामुळे रेल्वे स्टेशनना सुविधा द्याव्यात. रेल्वे स्टेशनची सुधारणा करावी. लिफ्ट, सरकते जिने करावेत. भिसेगावला जोडणाऱ्या ओव्हर ब्रिजचे काम एमएमआरडीच्या माध्यमातून सुरु आहे. त्या कामाला गती द्यावी.
प्रवासी संघटनेकडून समाधान
खासदार बारणे यांनी कर्जत पर्यंत लोकलमधून प्रवास केला. प्रवाशांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रवासी संघटनेच्या पदाधिका-यांशी संवाद साधला. त्यांचे गा-हाणे ऐकून घेतले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!