spot_img
spot_img
spot_img

अखेर राजेंद्र आणि सुशील हगवणे गजाआड!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पहाटे राजेंद्र हगवणे (वैष्णवीचे सासरे) आणि सुशील हगवणे (वैष्णवीचा दिर) या दोघांना अटक केली.पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे २०२५ रोजी वैष्णवी शशांक हगवणे या २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.

वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या असून, तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वैष्णवीच्या वडिलांनी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे. वैष्णवीची सासू लता हगवणे, नवरा शशांक आणि नणंद करिश्मा हगवणे अटकेत आहेतच आता तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!