शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारतातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) तर्फे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सीएसआर मध्ये काम करणाऱ्यांसाठी सर्टिफिकेट कोर्स (CCCSRP) ची घोषणा करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम सीएसआर क्षेत्रातील व्यावसायिक, कॉर्पोरेट आणि सामाजिक बदलासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना व्यावसायिक सीएसआर उपक्रम राबवण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
सीएसआर आणि शाश्वत विकास आजच्या व्यावसायिक जगतातील महत्त्वाचे घटक बनले असताना, हा सहा महिन्यांचा विशेष अभ्यासक्रम पुस्तकी आणि प्रात्यक्षिक शिकवण यांचा समतोल साधतो. या अभ्यासक्रमाचा उद्देश म्हणजे सीएसआर संकल्पना, धोरणे, अंमलबजावणी व मूल्यांकनाचे सखोल ज्ञान देणे आणि व्यावसायिकांना सामाजिकदृष्ट्या परिणामकारक प्रकल्प राबवण्यासाठी सक्षम बनवणे हा आहे.
अभ्यासक्रमाची प्रमुख उद्दिष्टे:
सीएसआरच्या मूलभूत संकल्पना आणि त्यांचे आधुनिक व्यवसायात महत्त्व समजून घेणे
सीएसआर प्रकल्प रचना, अंमलबजावणी आणि मूल्यमापन कौशल्य विकसित करणे
सीएसआर संबंधित कायदेशीर, नैतिक आणि नियामक बाबींचे सखोल ज्ञान मिळवणे
जागतिक सीएसआर ट्रेंड, स्टेकहोल्डरशी प्रभावी संवाद आणि शाश्वततेवर आधारित रणनीती समजून घेणे
व्यावसायिक संधी:
सीएसआर मॅनेजर, सस्टेनेबिलिटी कन्सल्टंट, इएसजी विश्लेषक, एथिकल सोर्सिंग आणि कंप्लायन्स मॅनेजर, पब्लिक अफेयर्स व कॉर्पोरेट कम्युनिकेशन मॅनेजर, सोशल इम्पॅक्ट कन्सल्टंट, सीएसआर व सस्टेनेबिलिटी पॉलिसी अॅनालिस्ट, सीएसआर ट्रेनर/शिक्षक, आणि सीएसआर क्षेत्रातील संशोधक.
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये:
कालावधी: ६ महिने
पात्रता: कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक
नोंदणी कालावधी: नोंदणी एका शैक्षणिक वर्षासाठी वैध आहे
अभ्यासक्रमाचे विभाग:
सीएसआर नैतिकता आणि प्रशासनाची मूलतत्त्वे
सीएसआर धोरण, नियोजन व अनुपालन
सीएसआर प्रकल्प व्यवस्थापन व अंमलबजावणी
सीएसआर परिणाम व समुदाय सहभाग
सीएसआर मध्ये लेखापरीक्षण व कर व्यवस्थापन
सीएसआर संवाद, निधी पर्याय व भविष्यातील प्रवृत्ती
शेवटी कॅपस्टोन प्रकल्प – प्रत्यक्ष प्रकल्पावर आधारित मूल्यांकन
या क्षेत्रात व्यावसायिक कारकीर्द करू इच्छिणाऱ्यांना भविष्यासाठी तयार करणे त्याच बरोबर पुस्तकी आणि प्रात्यक्षिक अभ्यासक्रमाची जोड देऊन नैतिक शाशन व शाश्वत विकासामधील कठीण आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करतो. हा कोर्स सीएसआर क्षेत्रात व्यावसायिक निर्णय घेण्याची क्षमता वाढवतो आणि दीर्घकालीन सामाजिक मूल्यनिर्मितीसाठी व्यासपीठ तयार करतो.
प्रवेश सुरू आहेत. अधिक माहितीसाठी कृपया सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) च्या https://www.scdl.net/programs/pg-certificate/distance-learning-certificate-course-in-csr-for-practitioners.aspx अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.