spot_img
spot_img
spot_img

पुण्यात रंगली ‘भूल चूक माफ’ची प्रेमकथा ; राजकुमार राव आणि वामीकाची धमाल एण्ट्री

आगामी चित्रपट ‘भूल चूक माफ’च्या प्रमोशनसाठी राजकुमार राव, वामीका गब्बी आणि दिग्दर्शक करण शर्मा नुकतेच पुण्यात आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत टीमने चित्रपटामागची संकल्पना, अनुभव आणि आठवणी शेअर केल्या.

मॅडॉक फिल्म्स आणि अमेझॉन एमजीएम स्टुडिओज निर्मित, करण शर्मा लिखित व दिग्दर्शित ‘भूल चूक माफ’ या प्रेमकथेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. २३ मे रोजी चित्रपटगृहांत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या चित्रपटात राजकुमार राव आणि वामीका गब्बी पहिल्यांदाच एकत्र झळकणार असून, हा सिनेमा प्रेक्षकांना विनोद आणि भावनांनी भरलेल्या एका नव्या प्रवासावर घेऊन जाणार आहे.

ही कथा एका रंजन नावाच्या तरुणाची आहे, जो आपल्या प्रेयसीचं मन जिंकण्यासाठी सरकारी नोकरी मिळवतो. मात्र, लग्नाच्या आदल्या दिवशीच त्याचं आयुष्य एकाच दिवसात अडकते. या विचित्र परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी रंजनचा संघर्ष आणि शोध यांची मजेदार आणि हृदयस्पर्शी कथा म्हणजेच ‘भूल चूक माफ’. ही आपल्यापैकी प्रत्येकाची कहाणी आहे. असे राजकुमार राव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

चित्रपटाबाबत निर्माता दिनेश विजन म्हणतात, “ही केवळ प्रेमकथा नाही, तर छोट्या शहरांतील जीवनशैली, नाती, स्वप्नं आणि त्यांच्या गोंधळातही असलेल्या नात्यांमध्ये असलेले सुंदरता याची ओळख करून देणारी कथा आहे. प्रेक्षकांना ती नक्कीच भावेल.”

दिग्दर्शक करण शर्मा यांच्या मते, “‘भूल चूक माफ’ ही अंतर्मुखतेने भरलेली विनोदी गोष्ट आहे जी आपण सगळे कधी ना कधी अनुभवतो. ही कथा प्रत्येकाला आपल्याशी संबंधित वाटेल.”

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!