शबनम न्यूज | पिंपरी
राज्यात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावर मागास राहिलेल्या मांग, मातंग, व इतर समाजाला आरक्षणाचे वर्गीकरण करून न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर तेलंगणा सरकारने यासाठीची अंमलबजावणी सुरू केली, त्यानंतर कर्नाटक सरकारही ही अंमलबजावणी करीत आहे, मात्र यात महाराष्ट्र सरकारने कोणत्याच हालचाली सुरू केल्या नसल्याने, सरकारला जाग आणण्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा मुंबईतील आझाद मैदान य़ा ठिकाणी झाले.
मातंग समाज हा पाहिलापासून महायुती सोबत राहिलेला आहे असे आमदार अमित गोरखे म्हणाले ..
यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी लवकर पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या 15 दिवसात सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात येईल असं आश्वासन व महसूल मंत्री व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिले आहे..
या प्रसंगी आमदार अमित गोरखे, आमदार सुनील कांबळे आमदार .जितेश अंतापुरकर . आमदार हेमंत ओगले
माजी मंत्री रमेश बागवे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे,
माजी आमदार अविनाश घाटे माजी आमदार ससाणे माजी आमदार सुधाकर भालेराव ,माजी आमदार गुंडिले साहेब,माजी आमदार थोरात माजी आमदार राजू आवळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आनंदा गुंडले, विष्णू भाऊ कसबे,adv राम चव्हाण,मारुती वाडेकर, सुधार धूपे, पंडित सूर्यवंशी,श्री मुखेडकर,
आधी समाजाचे नेते उपस्थित होते.