spot_img
spot_img
spot_img

औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकानी महावितरणकडे मांडल्या समस्या

शबनम न्यूज | पिंपरी

सोमवार दि. 19/05/2025 रोजी महावितरण कार्यालय भोसरी या ठिकाणी पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या बाबत बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष- संदीप बेलसरे, संचालक – संजय सातव, प्रमोद राणे, स्वीकृत संचालक – सुरेश गवस, सचिन पाटील तसेच उद्योजक कौस्तुभ मुरूदवार, संदीप सावंत, मनोज गजभिये तसेच महावितरण भोसरी कार्यालया तर्फे कार्यकारी अभियंता – अतुल देवकर, उपविभागीय अधिकारी – माने, सहाय्यक अभियंता – झोपे, राहुल पालके इ. उपस्थित होते.

      पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील भोसरी विभागात मे महिन्यापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे याचा मोठा परिणाम हा औद्योगिक परिसरातील उद्योगांवर झाला आहे. या बैठकीत वीज खंडित होण्यामागील  कारणे आणि त्यावरील उपाय योजनांवर सविस्तर चर्चा झाली.

खालील समस्यांचे प्रमुख मुद्दे मांडून  त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

सिंगल फेज व डिओ फेल्युअर्सच्या दुरुस्तीस होणारा उशीर :-

    ज्या समस्यांचे निराकरण 5 मिनिटात होऊ शकते, त्यासाठी सध्या 4-5 तास लागतात, कारण मनुष्यबळाची कमतरता आहे.

महावितरणने अधिक लाईनमान तैनात करण्याचे आश्वासन दिले आहे, जेणे करून दुरुस्ती वेळेत करता येईल.

फिडरचे क्रिम्पिंग :-

  •    फिडरला लागलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे. फिडर पिलर, एचआरसी, फलग्ज आणि फ्यूज वायरचे देखभाल व खराब झालेले बदलणे.
  • तुटलेले पिन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फीडर्स पिलर्स, रिंगमेन युनिटसचे आर्थिग तपासणे,
  • ऑइल फिल्टरेशन व ऑइल टेपिंगअप, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाइटिनिग अरेस्टर बदलणे,
  • विजखांब तारांचे मजबुतीकरण, तारांचे झोल कमी करणे, इतर विविध दुरुस्ती कामासह विजपुरवठ्याच्या पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवणे.
  • खराब किंवा जुने केबल्स बदलणे, केबल्स जॉइंटेर व खराब केबल शोधणारी वाहन संख्या वाढविणे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!