spot_img
spot_img
spot_img

महिला कामगारांसाठी स्वच्छतागृह उभारा ; अन्यथा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा

शबनम न्यूज | भोसरी

दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे पिंपरी चिंचवड भोसरी एमआयडीसी परिसरात अनेक महिला भगिनींच्या तक्रारी आल्या असून या औद्योगिक परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्यामुळे आणि त्या स्वच्छतागृहाची दुरावस्था झाल्याने मोठी गैरसोय निर्माण होत आहे, विशेषतः पावसाळ्यात महिलांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून परिसरात अंतर्गत बस वाहतूक नसल्यामुळे अनेक महिलांना पायीप्रवासा करावा लागतो

महानगरपालिकेचे लाडक्या बहिणीकडे असे दुर्लक्ष झाल्याची दिसून येते या परिसरामध्ये हजारोच्या संख्येने महिला कामगार या कामाला जात येत असतात त्याचप्रमाणे अनेक बाहेरील भागातून या ठिकाणी विद्यार्थिनी आणि महिला येत असतात महानगरपालिकेकडे दुर्गा ब्रिगेड संघटनेने वारंवार मागणी केल्यानंतर सुद्धा परिसरामध्ये महिला स्वच्छतागृहांची उभारणी करण्यासाठी शासन असक्षम ठरले आहे समाजात शासन लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी कामे करत असल्याचे देखावा करताना दिसतात परंतु महिलांच्या मूलभूत समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून ही महिला भगिनींची मोठी फसवणूक होत असल्याचे दिसून येते आज औद्योगिक परिसरामध्ये 3,000 एकर वर असलेल्या एमआयडीसीमध्ये 5000 ते आठ हजार कंपन्या असून या कंपन्यांमध्ये सकाळ संध्याकाळ रात्री अनेक महिला कर्मचारी या कामासाठी जात येत असतात परंतु पावसाळ्यात या महिलांना आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असताना दिसतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत असून परिसरामध्ये ठिकठिकाणी 22 ब्लॉक असून 22 ब्लॉगमध्ये कमीत कमी प्रत्येक ब्लॉकमध्ये दोन स्वच्छतागृह तरी महिला भगिनींसाठी उभे केले पाहिजेत अन्यथा दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे एमआयडीसी परिसरात रास्ता रोको आंदोलन छेडले जाऊन प्रशासनाला जागे करावी लागणार असल्याचे दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्ष दुर्गा भोर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!