spot_img
spot_img
spot_img

रवींद्र धंगेकर यांची शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी निवड

शबनम न्यूज | पुणे

सामान्य माणसांच्या हाकेला धावून जाणारे, पुणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी आज निवड झाली. ही निवड केल्याबद्दल रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच, पुण्यात पक्षाच्या वाढीसाठी पूर्ण प्रयत्न करून आपण टाकलेला विश्वास सार्थकी लावेन, असा शब्दही दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. तेव्हापासून धंगेकर यांना कोणते पद मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण, धंगेकर यांनी ‘मी कुठल्याही पदासाठी नव्हे; तर लोकांच्या समस्या जलद गतीने आणि प्रभावीपणे सोडवण्यासाठी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे, असे जाहीर केले होते.

धंगेकर यांची जनतेचे प्रश्न सोडवण्याबाबतची तळमळ आणि यासाठी आजवर केलेले काम पाहून शिवसेना पक्षाने आज स्वतःहून धंगेकर यांची महानगर प्रमुखपदी निवड केली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या महानगर प्रमुख पदी (कार्यक्षेत्र पुणे महानगर) आपली नियुक्ती करण्यात येत आहे, असे पत्र रवींद्र धंगेकर यांना शिवसेनेचे सचिव श्री. संजय मोरे यांच्याकडून आज देण्यात आले.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा मी सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करेन. पुण्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करेन. शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी माझी निवड केल्याबद्दल मनस्वी आभार.

– रवींद्र धंगेकर, माजी आमदार

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!