पिंपरी :- पैशांच्या देण्या-घेण्याच्या कारणावरुन वाद झाल्याने मोशीत पाच जणांनी मिळुण तरूणाला लोखंडी कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे ठार मारले आहे.
ज्ञानेश्वर उर्फ माऊली महादेव बर्गे (वय ३९ वर्षे) अस मयताच नाव आहे. भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या वॉचमनला ‘तू मध्ये आला तर तुलाही मारुन टाकील’, अशी धमकी दिली आहे. हा प्रकार (दि. १६) पहाटे ०२.५० वा सुमारास, मोशी-देहू रोड, मोशी येथे घडला.
याप्रकरणी महिलेने आरोपी १) अशोक पंडित म्हाळसकर वयः-३२ वर्षे राः-चिंबळी चौक, चिंबळी, २) रोहन पंडित म्हाळसकर वयः-२२ वर्षे राः-चिंबळी चौक, चिंबळी, ३) प्रसाद पंडित म्हाळसकर वयः-२५ वर्षे राः-चिंबळी चौक, चिंबळी, ताः-खेड, ४) संकेत हिरामण जैद वयः-२७ वर्षे राः जैदवस्ती, चिंबळी, ५) अमर अंकुश निळे वयः-२५ वर्षे राः-चिंबळी चौक, चिंबळी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे.