spot_img
spot_img
spot_img

क्रीडापटूंसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्या – मंत्री आदिती तटकरे

शबनम न्यूज | मुंबई

मौजे धाटव येथे तालुका क्रीडा संकुलाच्या डागडुजीचे तसेच क्रीडापटूंना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. जे क्रीडा प्रकार मोठ्या प्रमाणात खेळले जातात, त्या खेळाचे साहित्य क्रीडापटूंना उपलब्ध करून त्यांना सुविधा पुरविल्या जाव्यात, अशा सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

तालुका क्रीडा संकुल, श्रीवर्धन मतदार संघातील प्रलंबित तलाठी कार्यालय, इंदापूर येथे प्रस्तावित एमआयडीसी, एसएनडीटी कॉलेज वाडघर यासंदर्भात मंत्रालयात नुकतेच आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, मौजे धाटव येथे जे खेळाडू मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना संबंधित खेळाचे साहित्य व सुविधा उपलब्ध करून द्या. खो –खो व कबड्डी मैदानावर गोलाकार पत्राशेड व इतर कामे, बसण्यासाठी स्टेप्स, चेंजिंग रूम, पाण्याचा निचरा होण्यासाठी सोय, भूमिगत पाण्याचा टँक बांधण्याची कामे जलगतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तालुका क्रीडा संकूल म्हसळा, रोहा, माणगाव येथील कामाचा आढावा घेतला.

श्रीवर्धन येथील तलाठी कार्यालयाच्या कामास मंजूरी असून, अद्याप काम पूर्ण झाले नसल्याने तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी मंत्री तटकरे यांनी दिले. तसेच इंदापूर येथे प्रस्तावित एमआयडीसी, एसएनडीटी कॉलेज वाडघर यासंदर्भातील कामाचा आढावाही यावेळी मंत्री तटकरे यांनी घेतला.

यावेळी माणगाव तहसीलदार दशरथ काळे, किशोर देशमुख, महेंद्र वाकलीकर यांचे औद्योगिक विकास महामंडळाचे सहकार्यकारी अधिकारी कुणाल खेमराज यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!