spot_img
spot_img
spot_img

पावसाळ्यापूर्वी संपूर्ण स्ट्रॉम, ड्रिनेज लाइन, नाले सफाई करा – नाना काटे

शबनम न्यूज | पिंपरी

पावसाळ्यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील संपूर्ण स्ट्रॉम, ड्रिनेज लाइन, नाले सफाई करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, शहरातील संपूर्ण स्ट्रॉम, ड्रिनेज लाइन, नाले सफाई पावसाळ्यापूर्वी स्वच्छ केली जाते. मात्र, अजूनही नालेसफाई करण्यात आलेली नसून अवकाळी पाऊस सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील संपूर्ण स्ट्रॉम, ड्रिनेज लाइन, नाले सफाई करण्यात यावी, तसेच शहरातील संपूर्ण भागात कचरा साफ न केल्याने तसेच रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले असल्याने वाहने चालवताना समस्या होत आहे, यामध्ये साचलेले घाणीचे साम्राज्य आणि आरोग्याला धोका निर्माण होत आहे. जर अवकाळी पावसाने शहराचे हाल होत असतील तर हे नुकतेच येऊन ठेपलेल्या मोठ्या पावसात शहराची स्थिती जलमय होत असेल तर पावसाळ्यात शहरातील समस्या वाढीत वाढ होणार आहे. यापूर्वीच शहरातील सर्व स्ट्रॉम, ड्रिनेज लाइन, नाले सफाई करण्यात यावी, असेही नाना काटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!