शबनम न्यूज | पिंपरी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त माजी उपमहापौर तुषार हिंगे मित्र परिवार व उत्सव समितीने बर्ड व्हॅली येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्त संकलन केद्राचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे , माजी नगरसेविका अनुराधा गोरखे,उप आयुक्त अण्णा बोदडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घावटे , धनाजी येळकर पाटील , कुशाग्र कदम , काशिनाथ नखाते , प्रविण कदम , सतिष काळे , निलेश टेमकर , प्रशांत जाधव , सागर तापकीर , जिवन बोराडे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे आयोजन जितेंद्र छाबडा , रामराजे बसवणे , सिध्दीविनायक गणपती मंदिर मंडळ व संघर्ष मित्र मंडळ यांनी केले.