शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील सीबीएससी बोर्डाचा इयत्ता दहावी आणि बारावी या वर्गांचा निकाल नुकताच जाहीर झाला.
यामध्ये २०२४-२५ या वर्षातील एकूण २७५ विद्यार्थ्यांपैकी १०६ विद्यार्थ्यांनी ९१ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. पहिले पाच क्रमांक मुलींनी मिळवले आहेत.
दहावी मध्ये प्रथम क्रमांक आकांक्षा फाकटकर ९९ टक्के, द्वितीय क्रमांक अमिता नेरलीकर ९८.४ टक्के, तृतीय क्रमांक तनिष्का झा ९८.२ टक्के, चौथा क्रमांक आरोही निकम ९८ टक्के आणि पाचवा क्रमांक पर्णिका अभंग ९७.८० टक्के यांचा समावेश आहे.
आकांक्षा फाकटकर हिने मराठी, अमिता नेरलीकर हिने संस्कृत, तनिष्का झा हिने गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहेत.
बारावी मध्ये आर्या कुलकर्णी हिने ९३.६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. मुदीत सराफ ९३.२ टक्के द्वितीय क्रमांक, लावण्या एरंडे ८६.४ टक्के, चतुर्थ क्रमांक प्रेक्षा कपूर ८६ टक्के आणि पाचवा क्रमांक यशश्री शहा ८५.६ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.
तसेच माहिती तंत्रज्ञान विषयात ४० विद्यार्थ्यांनी १०० गुण १८ विद्यार्थ्यांनी ९९ गुण मिळवले आहेत. आर्थिक व्यवस्थापन विषयात १३ विद्यार्थ्यांना १०० गुण ५ विद्यार्थ्यांना ९९ गुण मिळाले आहेत.
प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी यांचे आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.