spot_img
spot_img
spot_img

स्थायी समितीची बैठकीत विविध विषयक कामांना मंजुरी

शबनम न्यूज | पिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत महापालिका प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाकडील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवठा करणे, महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नेहरूनगर, क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत चिखली या ठिकाणच्या स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक एअर पोल्युशन कंट्रोल यंत्रणा बसविणे, कै. वस्ताद बाळासाहेब गावडे जलतरण तलाव, केशवनगर भाडे तत्वावर चालविण्यास देणे, महापालिकेच्या नर्सरीमध्ये वृक्षारोपणासाठी रोपे तयार करणे, प्रभाग क्र. ३ मोशी येथील गट क्र. ६४६ येथील मुस्लीम दफनभूमी विकसित करणे, काळभोरनगर येथील महापालिका विद्यालयात डिजीटल क्लासरूम करिता आवश्यक डिजीटल यंत्रणा खरेदी करणे, निगडी स्मशानभूमी, लिंकरोड स्मशानभूमीमधील हिंदू दफनभूमीकरिता साफसफाई व स्वच्छतेकामी मनुष्यबळ ठेकेदार पद्धतीने पुरविणे, लक्ष्मणनगर, गणेशनगर येथील पाण्याची टाकी परिसरात स्थापत्य विषयक कामे करणे, ई क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वडमुखवाडी, चोविसवाडी, स्टेडियम पाण्याची टाकी परिक्षेत्रातील वितरण व्यवस्थेविषयक दुरूस्तीची कामे करणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!