spot_img
spot_img
spot_img

धार्मिक स्थळांवर लगेचच कारवाई नाही – पिंपरी चिंचवड म.न.पा. आयुक्त शेखर सिंह

पिंपरी : कुदळवाडी चिखली परिसरात नोटीस दिलेल्या धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण कारवाई लगेचच करण्यात येणार नाही. सर्वोच्च न्यायालय तसेच राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने तसेच यासंदर्भामध्ये प्राप्त झालेल्या खुलाश्यांवर संपूर्ण सुनवणी प्रक्रिया पार पाडूनच पुढील कारवाई केली जाईल असे स्पष्ट आश्वासन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री शेखर सिंह यांनी आज मस्जिद और मदरसा ॲक्शन कमिटीच्या संयुक्त शिष्ट मंडळास दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत ॲक्शन कमिटीचे राहुल डंबाळे , फजल शेख , शहाबुद्दीन शेख , नियाज सिद्दीकी , बाबा कांबळे , गुलजार शेख , युसुफ कुरैशी , मौलाना नय्यर नुरी , कारी इक्बाल उस्मानी , सय्यद गुलाम रसुल , याकुब शेख , रशिद सय्यद , शकुरुल्ला पठाण , वाहीद कुरैशी , आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पोलीस उपायुक्त शिवाजी पवार , सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक पार पडली.

यावेळी नोटीस धारक मशिदींच्या प्रतिनिधींनी संपूर्ण हकीकत व्यक्त करत सर्व मशिदी या खाजगी जागेवर असून त्या राज्य शासनाच्या धोरणानुसार नियमित होण्यास पात्र असून तशी कार्यवाही आमच्याकडून सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सदर धार्मिक स्थळे अधिकृत करून द्यावी अशी विनंती केली.

यावेळी राज्य शासनाने यापूर्वीच छत्रपती , कोल्हापूर , मीरा-भाईंदर, मुंबई , नागपुर इत्यादी महानगरपालिका क्षेत्रांमधील हजारो धार्मिक स्थळे नियमित केल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर या सर्व बाबींची सविस्तर माहिती घेऊन जी धार्मिक स्थळे नियमानुकूल होणे शक्य असतील त्यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे देखील स्पष्ट आश्वासन आयुक्तांनी दिले.

दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने धार्मिक स्थळांना कारवाईबाबत दिलेली नोटीस ही अत्यंत चुकीची असून इतर महापालिकांप्रमाणे धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत यावेळी शिष्टमंडळातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी केले. दरम्यान महानगरपालिकेने एकतर्फी कारवाई केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो अशी भीती देखील यावेळी व्यक्त केली गेली. दरम्यान सध्या भारत-पाक युद्धाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शहरांमध्ये अन्य कोणताही तनाव निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवर ही कारवाई रद्द करावी अशी आग्रही विनंती करण्यात आली होती.

दरम्यान नोटीस दिलेल्यां पैकी पाच मशिदींना छत्रपती संभाजी नगर येथील वक्फ ट्रीब्युनल बोर्डाने कारवाई करण्यास मनपाला स्थगिती आदेश दिलेले आहेत.

दरम्यान धार्मिक स्थळे नियमातून करण्यासंदर्भामध्ये नोडल अधिकारी म्हणून शहर अभियंता मकरंद निकम यांचेशी संपर्क साधण्याबाबत शिष्टमंडळास आयुक्तांनी सांगितले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!