spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे

पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे  यांची वर्णी लागली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात घोषणा केली, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शत्रुघ्न काटे आमदारकी लढविण्यासाठी इच्छुक होते. पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी शत्रुघ्न काटे यांना कार्यकारी अध्यक्ष पद सोपविले होते दरम्यान अध्यक्ष पद शर्यतीत माजी नगरसेवक तथा  सत्तारूढ पक्ष नेते  नामदेव ढाके यांच्या सह अनेक जण इच्छुक होते, परंतु पक्षश्रेष्ठींनी शत्रुघ्न काटे काटे यांना शब्द दिल्याने अखेर शत्रुघ्न काटे यांची भाजप शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सलग तीन वेळेस नगरसेवक म्हणून शत्रुघन काटे निवडून आले आहेत तसेच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. भाजप पक्षश्रेष्ठींनी दिलेला शब्द पाळला व भाजपा च्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे विराजमान झाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!