प्राधिकरण, निगडी- प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ व मधुमेह संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने माउली उद्यानातील ॐकार सभामंडपात परिचारिका दिन साजरा करण्यात आला.
दीपप्रज्वलन,आशा नष्टे रचित स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.मोनालिसा पारगे प्रिन्सिपॉल नर्सिंग कॉलेज ऑफ तळेगाव या होत्या
.मधुमेह संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर इंगोले व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव मुळूक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पाहुण्यांचा परिचय डॉक्टर ज्योती इंगोले यांनी करून दिला. उपस्थित.पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या सदस्य सौ आशा नष्टे यांनी प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाला दिलेल्या पंचवीस हजार रुपयांच्या देणगीच्या व्याजातून सर्व परिचारिकांचा सत्कार करण्यात आला.
परिचारिका म्हणून काम करून सेवानिवृत्त होऊनही परिवार आणि समाजासाठी कार्यरत असणाऱ्या सौ आशा नष्टे,माधुरी डिसोजा,रजनी कोटस्थाने,अरुणा पंडित,सविता साठे,पुष्पलता सूर्यवंशी,वत्सला वाघचौरे,शोभना जोशी यांचा समावेश होता.उपस्थित परिचारिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कै रामचंद्र लोहार यांचा मरणौत्तर सत्कार त्यांच्या कुटुंबियांनी स्विकारला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र मिसाळ यांनी केले.शंकर नरूटे यांनी आभार प्रदर्शन केले. संघाच्या प्रार्थणेने व सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रमाची सांगता झाली.