पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात एका 18 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. कोमल भरत जाधव असे मृत तरुणीचे नाव असून तिच्या हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. हत्येच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, रविवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास दोन जणांनी कोमल जाधव या मुलीला धारदार शस्त्राने वार केले तिच्या घरा समोरच तिचा खून केला
दरम्यान, भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे वाल्हेकरवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी भर चौकात अशा प्रकारे तरुणीची हत्या झाल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. स्थानिक नागरिकांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.