राज्यात आठवडाभर वळीवाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. परिणामी विदर्भात वाऱ्याचा वेग वाढणार आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दरम्यान, या कालावधीत संपूर्ण राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हवेच्या दाबात घट आणि नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आठवडाभर राज्यावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र राहील. यामुळे यवतमाळ, बुलढाणा, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी १६ कि.मी. तर अकोला जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी २२ कि.मी. राहील. उत्तर महाराष्ट्र, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भात आणि कोकणात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.