छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर
पिंपरी चिंचवड़ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर तुषार हिंगे यांच्या आरंभ सोशल फाउंडेशन व छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त युवक युवतींनी आपले रक्तदान करावे असे आवाहन तुषार हिंगे यांनी केले आहे.
बुधवार दिनांक 14 मे रोजी सकाळी आठ ते सायंकाळी या वेळेत बर्ड व्हॅली उद्यान ,संभाजीनगर, चिंचवड येथे सदर रक्तदान शिबिर संपन्न होत आहे.
तरी मोठ्या संख्येने सदर रक्तदान शिबिर मध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी केले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी रक्तदाता नाव नोंदणी अर्ज उपलब्ध करण्यात आले आहे तरी इच्छुकांनी नाव नोंदणी अर्ज भरून पाठवावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
खाली दिलेले लिंक वर रक्तदात्यांनी आपले अर्ज भरावे.