spot_img
spot_img
spot_img

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्रम महर्षी तर कामगार नेते यशवंत भोसले यांना श्रमयोगी पुरस्कार प्रदान

पुणे – सातारा चेंबर्स ऑफ कॉमर्स, व पुण्यातील श्रमिक, कामगार आणि उद्योजक यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “श्रम महर्षी” आणि कामगार क्षेत्रातील 30 वर्षांचे प्रदीर्घ सेवेबद्धल तर पिंपरी चिंचवड शहरातील कामगार नेते यशवंत भोसले यांना “श्रमयोगी” हा पुरस्कार प्रधान करण्यात आला . या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहू शकले नाही त्यांच्या ऐवजी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नामदार शंभूराज देसाई यांनी हजेरी लावत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा “श्रम महर्षी”पुरस्कार स्वीकारला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनराव शिंदे पाटील होते.

पिंपरी चिंचवड शहरातील ग.दि . माडगूळकर सभागृहात संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्या चे आयोजक जेष्ठ पत्रकार अरुण उर्फ नाना कांबळे यांनी या वेळी सर्वांचे स्वागत केले या वेळी ,संचालक विजयजी सोनावले यांनी प्रास्ताविक केले, गणेशजी दरेकर, राजेंद्र खेडेकर, स्वानंद राजपाठक, रामराजे भोसले, जयदेवजी अक्कलकोटे, दिनेशजी पाटील, इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

याच कार्यक्रमात संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संत तुकाराम नगर मधील गृह सोसायटीच्या सभासदांना मा.नामदार शंभूराज देसाई साहेब यांचेहस्ते शेअर सर्टिफिकेट वाटपाचा शुभारंभ केला,सोसायटीचे कार्यकारणी पदाधिकारी सर्व .अंकुश वाघमारे,ओंकारजी जोकारे, मानसीताई देशपांडे, सतीश जी सासवडे,शिरीषजी सासवडे,योगेंद्रजी आरवडे,राजारामजी भोंडवे,मनोजजी नांदे,विनायकजी निकम, इस्मत दीदी सुलताना सय्यद, शालन ताई महापुरे,फौजदार जी गायकवाड, अप्पूकूटन नायर,अंकुश गायकवाड,सुधाकर जी शिंदे, मल्लेशजी कोरवी,किसनजी भाग्यवंत,राजेंद्र जी पाटील,रावसाहेब पाबळे,अप्पासाहेब जी माने, संतोष जी चौधरी,श्रीमती आरती ताई पराळे,अरुणा ताई भंडारी,शालन ताई भंडारे,शेअनाज मौलवी,गणेशजी गुलदगड, गवळण ताई, उषाताई टाकळकर, कार्यालयीन सचिव अमोलजी घोरपडे, सोमनाथजी वीरकर,अर्श जमादार, सोनाली वीरकर,मोठया संख्येने पत्रकार ,राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सभासद प्रचंड संख्येने उपस्थित होते. उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!