शबनम न्यूज | पिंपरी- चिंचवड
मिस ग्रँड इंडिया या सौंदर्य स्पर्धेच्या मंचावर जाणे हे अनेक मुलींची स्वप्ने असतात, याच स्वप्नांचा पाठपुरावा पिंपरी चिंचवड शहरात राहणारी अलिशा पठाण यांनी केला आहे. सामान्य घरातून आलेली मास्टर्स डिग्री मिळविणारी आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्याच्या मार्गावर असलेली इंडियाच्या मंचावरून महाराष्ट्राचे नाही तर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी युवती ठरली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात राहणारी अलिशा पठाण हि नुकतीच मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेच्या शर्यतीत सामील झाली आहे. एकूण 6000 स्पर्धकांच्या शर्यतीतून मिस ग्रँड इंडिया या स्पर्धेसाठी आलिशापाठाण हीची निवड झाली आहे. तिने आपला हा प्रवास प्रसार माध्यमांकडे मुलाखत देताना मांडलाय, लहानपणापासूनच अभिनयाची आणि मॉडलिंग क्षेत्राची आवड यातूनच अनेक फॅशन शो नृत्य आणि अभिनय स्पर्धेमध्ये तिने भाग घेतला आहे तसेच अनेक वेळा ऑडिशन दिल्या.
सध्या अलिशा पठाण ग्लोबल हेल्थ सेक्टरमध्ये ग्लोबल हेल्थ मॅनेजर म्हणून काम करते, जिथे ती जागतिक आरोग्य धोरणे, विमा पॉलिसीज आणि पब्लिक वेल-बीइंग यांचा दुवा जोडते. अलिशा पठाण पहिल्या पिढीतील पोस्टग्रॅज्युएट आहे, जिने हॉस्पिटल अॅण्ड हेल्थकेअर अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये MBA पूर्ण केला आहे.
लहानपणापासूनचअलिशा पठाण हिला अभिनय, मॉडेलिंग, नृत्य, ची आवड होती . तिने अनेक फॅशन शो, नृत्य आणि अभिनय स्पर्धांमध्ये भाग घेतला. शिक्षण पूर्ण करत असताना, जसलोक हॉस्पिटलसह दिल्ली, मुंबई, पुणे येथे इंटर्नशिप्स करून अनुभवही घेतला.
त्याचबरोबर, तिने ऑल इंडिया युनिव्हर्सिटी योगा चॅम्पियनशिपमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि AFMC पुणे येथे “Stress-Induced Aggression Among Healthcare Professionals” या विषयावर रिसर्च बेस्ड ई-पोस्टर सादर करून दुसरा क्रमांक पटकावला आहे. माझे स्वच्छ पुणे, हरित पुणे, आणि सेव्ह वॉटर सारख्या सामाजिक उपक्रमातही तिचे मोठे योगदान आहे.
व्यावसायिक आयुष्यासोबतच, अलिशा पठाण एक कुशल नृत्यांगना, योग प्रशिक्षक, कंटेंट रायटर, व्लॉगर, आणि बागकामाची आवड असलेली व्यक्ती आहे. अलिशा पठाण सांगते संघर्षमय, परंतु प्रेरणादायी प्रवासात, माझ्या आई-वडिलांचा आणि मेंटर्सचा महत्त्वपूर्ण पाठिंबा मला नेहमीच मिळाला आहे—विशेषतः माझ्या आईचा, जिने मला प्रत्येक समस्येला सामोरे जाण्याची ताकद दिली.आज मी, एक सामान्य घरातून आलेली, पहिली महिला मास्टर्स डिग्री मिळवणारी, माझ्या स्वप्नांची पूर्तता करण्याच्या मार्गावर आहे. मिस ग्रँड इंडियाच्या मंचावरून मी केवळ अभिनेत्री होण्याचे स्वप्न सोडून नाही, तर एक जागतिक आरोग्य वकिल आणि समाजासाठी काम करणारी व्यक्ती होण्याचा संकल्प घेऊन उभी आहे.माझे ध्येय सीमांपलीकडे जाऊन संस्कृतींना जोडणे, नव्या कथा सांगणे, आणि जगभरातील आवाजांना पुढे आणणे हेच आहे.
लहानपणापासूनच मला अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्राची खूप आवड होती. मी अनेक फॅशन शो, नृत्य आणि अभिनय स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि अनेक वेळा ऑडिशन्स दिल्या. या सर्व अनुभवांनी मला आज मी जी आहे, ती घडवले. शिक्षणातही मी तितकीच मेहनत घेतली आणि २०२४ मध्ये हॉस्पिटल अॅण्ड हेल्थकेअर अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स पूर्ण केले. दिल्ली, मुंबई आणि पुण्यात काम करण्याची संधी मिळाली आणि जसलोक हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिपही केली. या प्रवासात माझ्या आई-वडिलांचा मोठा पाठिंबा होता. कोणतीही अडचण आली, की मी माझ्या आईकडे मार्गदर्शनासाठी धाव घेत असे. माझ्या मेंटर्सनी मला योग्य दिशा दिली आणि आज मी जशी आहे, तशी घडण्यामागे सर्वांचा मोठा वाटा आहे.
– अलिशा पठाण
(Miss Grand India finalist)