शबनम न्यूज | पिंपरी
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहरचा २० वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यावेळी हितचिंतक सभासद आणि कुटुंबीय यांच्यासाठी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वर्धापन दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत खुळे साहेब उपस्थित होते. विश्वजीत खुळे साहेब यांनी संस्कार प्रतिष्ठानच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले. पोलिसांना मदत करताना संस्कार प्रतिष्ठानचे सदस्य कोणताही विचार न करता सर्वतोपरी मदत करत असतात. यामुळे आमच्यासोबत काम करत असताना पोलिसांवर होणारा ताण तणाव कमी होण्यास मदत होते. आणि अतिशय योजनाबद्ध बंदोबस्त हे कार्यकर्ते करत असतात. आणि आगामी येणाऱ्या विविध प्रसंगी संस्था अशीच पोलीस प्रशासनाच्या मागे उभे राहून मदत करत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे साहेब यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे नुकतेच गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाले यामध्ये संस्कार प्रतिष्ठान सोबत काम करणारे श्री प्रकाश चव्हाण टाटा मोटर्स श्री संदीप रांगोळी टाटा मोटर्स आणि श्री युवराज शिंदे प्रीमियर ऑटोमेशन चाकण यांचा सन्मान वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री खुळे साहेब आणि संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.
याच वेळी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल कुमारी श्रद्धा येवले यांचा नवरात्र बंदोबस्तात उत्कृष्ट काम केल्याबद्दल ही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड सचिव आनंद पाथरे उपाध्यक्ष नम्रता बांदल उपाध्यक्ष शब्बीर मुजावर खजिनदार श्री मनोहर कड संचालक प्रिया पुजारी संचालक सोहन चितलांगे संध्या स्वामी आनंद पुजारी रूपाली पाथरे सुनीता गायकवाड मिलन गायकवाड ओम पाथरे यांनी केले होते.