शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सहा रुग्णालयांकरिता सोनोग्राफी मशीन खरेदी निविदा प्रक्रियेची चौकशी करावी तज्ञ समिती नेमून सदर चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोलाटकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे केली आहे. राहुल कोल्हाटकर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या मध्यवर्ती भांडार विभाग यांच्या वतीने वैद्यकिय विभागाकडील नवीन भोसरी, जिजामाता, थेरगाव , आकुर्डी , सांगवी, यमुनानगर रुग्णालये आणि वायसीएम रुग्णालयाकडील भुलशास्त्र विभागासाठी Color Doppler Ultrasound Machine यांची खरेदी करण्यासाठी ई निविदा ३६/२०२४-२५ दिनांक ०९ /१०/२०२४ ते २३/१०/२०२४ या कालावधीत प्रसिध्द करण्यात आली होती. सदर निवेदेच्या प्रि – बीड मीटिंग मध्ये ज्या ठेकेदार अथवा कंपन्या सहभागी झाल्या होत्या त्यांनी सदर वस्तू खरेदी बाबत कोणत्या सूचना केल्या होत्या त्यानुसार सदर मशीन खरेदीसाठी एक प्रि- बीड अमेटमेंट अहवाल मा.आयुक्त आणि वैद्यकिय अधिकारी यांच्या मान्यतेने तयार केला असेल तरी सदर वस्तूचा पुरवठा हा त्याच प्रि- बीड अमेटमेंट अहवाल नुसार झाला आहे का याची पाहणी वैद्यकिय अधिकारी यांनी केली आहे का ?
वरील उल्लेख करण्यात आलेल्या Color Doppler Ultrasound Machine ह्या साहित्याची खरेदी ही त्या प्रि- बीड अमेटमेंटनुसार झाली नाही अशी शंका उपस्थीत होत असल्याने ई निविदा ३६/२०२४-२५ ने खरेदी करण्यात आलेल्या Color Doppler Ultrasound Machine यांची तपासणी करण्यात यावी आणि सदर निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी दिनांक १७.०४.२०२५ रोजी निवेदनाच्या माध्यमातुन डॉ. लक्ष्मण गोफने , वैद्यकिय अधिकारी आणि श्री.निलेश भदाने उपायुक्त भांडार विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना प्रत्यक्ष भेटून केली पण आज दिनांक ०७.०५.२०२५ पर्यंत वरील निवेदनाच्या माध्यमातून उपस्थिती केलेल्या प्रश्नावर भांडार विभाग किंवा वैद्यकिय विभाग यांनी कोणताही अहवाल तयार केला नाही किंवा दिलेल्या निवेदनावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याने सदर खरेदी करण्यात आलेल्या सोनोग्राफी मशीन ह्या प्रि- बीड अमेटमेंट अहवाल नुसार खरेदी झाल्या नसल्याचे स्पष्ट होते तरी सदर सोनोग्राफी मशीन खरेदी मध्ये अधिकारी यांनी गैरव्यवहार केल्याचे आढळून येते तरी सदर सोनोग्राफी मशीन खरेदी प्रक्रियेची चौकशी येत्या १० दिवसात एक समिती नेमून करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातुन राहुल कोल्हटकर यांनी केली आहे.