शबनम न्यूज | तळेगांव दाभाडे
‘मुख्यमंत्री १०० दिवस’ कृती कार्यक्रमात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयीन स्तरावर झालेल्या परिक्षणात तळेगांव दाभाडे व चिखली पो.स्टे. यांनी संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकावला आहे. दरम्यान द्वितीय क्रमांक भोसरी पोलीस स्टेशन, देहुरोड पोलीस स्टेशन, तृतीय क्रमांक दिघी पोलीस स्टेशन, पिंपरी पोलीस स्टेशन यांनी पटकावला आहे. पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अभिनंदन केले आहे.
दुसऱ्या टप्यांतर्गत १०० दिवसांत करावयाच्या कार्यालयीन सुधारणा, कामकाज याचे परिक्षण पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर यांनी केले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस स्टेशनना प्रत्यक्षात भेटी देउन पोलीस स्टेशन स्तरावर केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला.
या दरम्यान पोलीस स्टेशन येथील गुन्हे निर्गती, मुद्देमाल निर्गती, कार्यालयीन रंगरंगोटी, स्वच्छता, अभ्यागत कक्ष, बेवारस वाहनांची निर्गती, नाविन्यपूर्ण उपक्रम या निकषावर पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशनचे मुल्यमापन करण्यात आले. त्या निकषावर गुणानुक्रम तयार करुन पोस्टे यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देणेत आले आहेत.