शबनम न्यूज | पिंपरी
भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी कारवाईनंतर पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे जल्लोष करण्यात आला. भाजपा मध्यवर्ती कार्यालय, मोरवाडी येथे कार्यकर्त्यांनी एकत्र येत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने ७ मे रोजी पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या कारवाईत लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या प्रशिक्षण केंद्रांसह नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, भिमबर, कोटली आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने एकत्रितपणे ही मोहीम यशस्वी केली.
या यशस्वी कारवाईनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोरवाडी येथील कार्यालयात एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. विधानपरिषद आमदार उमाताई खापरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘भारतीय लष्कराचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी आमदार उमाताई खापरे म्हणाल्या की, “भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी करून देशाचा गौरव वाढवला आहे. भारतीय सैनिकांच्या शौर्याला आणि बलिदानाला आमचा सलाम आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाने प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ही अतुलनीय कामगिरी केली आहे. भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर या यशाचा जल्लोष करून भारतीय सैनिकांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत आहे.”
या कार्यक्रमात विधानपरिषद आमदार उमाताई खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, शैला मोळक, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, सिद्धेश्वर बारणे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेविका साविताताई कुटे, सविताताई खुळे, आरती चोंधे, शर्मिला बाबर, अनुराधा गोरखे, वैशाली खाड्ये, मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, मोहन राऊत, हर्षल नढे, रामदास कुटे, अमोल डोळस, सोमनाथ तापकीर, सनी बारणे, ऍड. योगेश सोनवणे, जयदीप खापरे, शिवराज लांडगे, निलेश अष्टेकर, बिभीषण चौधरी, शेखर चिंचवडे, कैलास सानप, मनोज ब्राह्मणकर, दत्तात्रेय ढगे, सचिन शिवले, भूषण जोशी, युवराज ढोरे, विनायक शिंदे, अमित गवळी, निलेश सरोदे, सचिन बंदी, देवदत्त लांडे, राहुल काटे, गणेश आर. ढाकणे, गणेश वाळुंजकर, विनोद तापकीर, गणेश लंगोटे, आदेश नवले, पल्लवी मारकड, रमेश काळे, कमलेश भरवाल, अजित बुर्डे, संजय पटनी, नंदू कदम, दत्ता चिंचवडे, शोभा भराडे, आशा काळे, निता कुशारे, राजश्री जायभाय, विजय शिनकर, संजय परळीकर, गीता महेंद्रू यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.