शबनम न्यूज | पुणे
आज राज्यातील सात जिल्ह्यांसह पुण्यात देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये वादळी पाऊस तसेच गारपीटीची शक्यता दर्शवण्यात आली आहे. पुण्यासह जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड या जिल्ह्यांना हवामान विभागाच्या वतीने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार ,धुळे ,कोल्हापूर, सांगली, सोलापूर ,धाराशिव ,लातूर ,परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच राज्यात मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही भागात हलक्या सरी कोसळत आहेत /हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरात दिवसभर अशांतता ढगाळ वातावरण राहणारा असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात असा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.